जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Social media वरील Beauty hack ने वाचवला महिलेचा जीव; झालं कॅन्सरचं निदान

Social media वरील Beauty hack ने वाचवला महिलेचा जीव; झालं कॅन्सरचं निदान

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

तिनं दोन हजार वर्षांपूर्वीच्या चायनीज ब्यूटी हॅकचा व्हिडिओ पाहिला होता. हा व्हिडिओ तिचा जीव वाचण्यास कारणीभूत ठरला.

  • -MIN READ Trending Desk Delhi
  • Last Updated :

    मुंबई, 10 फेब्रुवारी : कॅन्सर अर्थात कर्करोग हा गंभीर स्वरूपाचा आजार आहे. कॅन्सरचं वेळीच निदान झालं, तरच संबंधित रुग्ण वाचू शकतो. आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक माहितीपर गोष्टींचे व्हिडिओज शेअर होत असतात. टिकटॉकवर असाच एक आरोग्याशी निगडित व्हिडिओ पाहिल्यानंतर ‘आपल्याला कॅन्सर झाला आहे’ असं एका तरुणीच्या लक्षात आलं. तिनं दोन हजार वर्षांपूर्वीच्या चायनीज ब्यूटी हॅकचा व्हिडिओ पाहिला होता. हा व्हिडिओ तिचा जीव वाचण्यास कारणीभूत ठरला. या तरुणीची नेमकी कहाणी काय आहे, ते जाणून घेऊया. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. टिकटॉकवरच्या एका ट्रेंडमुळे तरुणीचा जीव वाचल्याचे समोर आले आहे. `डेली मेल`ने दिलेल्या वृत्तानुसार, या तरुणीने 2022मध्ये टिकटॉकवर एक ब्युटी हॅक पाहिलं आणि त्यानंतर तिने ते ट्रायदेखील केलं; पण यादरम्यान आपल्या गालाच्या खालच्या बाजूस एक मोठी गाठ आहे, असं तिला समजलं. चेहऱ्याखाली काही तरी विचित्र जाणवत असल्याने तिने तात्काळ वैद्यकीय तपासणी करून घेतली. या तपासणीच्या अहवालातून तिच्या शरीरात गंभीर कॅन्सरच्या 20 गाठी असल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान, वजन कमी होण्याचा अनुभव या तरुणीने सोशल मीडियावरून शेअर केला आहे. `माझं वजन झपाट्यानं कमी होत होतं; मात्र मी सडपातळ होत आहे याचा मला आनंद होता; पण कॅन्सरमुळे वजन कमी होतंय, याची जाणीव मला नव्हती,` असं तिनं सांगितलं. या तरुणीचं नाव हेलेन बेंडर असं आहे. हेलेनने सांगितलं, की `पाच वर्षांपूर्वी मला मेलॅनोमावर उपचार घ्यावे लागले होते. त्यानंतर डॉक्टरांनी सातत्याने तपासणी करण्याचा सल्ला दिला होता. काही कारणांमुळे मला रूटीन फॉलो करणं जमलं नाही. त्यामुळे मी कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या विळख्यात सापडले. त्यानंतर खांद्यावर ही गाठ आल्याचं मला समजलं. मग तिने संपूर्ण स्कॅनिंग करून घेतलं.` टिकटॉकवर हेलेनने जी ब्युटी ट्रीटमेंट पाहिली होती. तिचं नाव `गुआ शा`असं आहे. हे तंत्र फार जुनं आहे. या तंत्रात एका टूलच्या पुढच्या भागाने चेहऱ्याच्या त्वचेवर मसाज केला जातो. या चायनीज ब्युटी हॅकमुळे त्वचेतला रक्तप्रवाह सुरळीत राहतो. तसंच चेहऱ्यावरची सूजही कमी होते; पण या ट्रीटमेंटमुळे रक्तवाहिन्यांचं नुकसान होण्याचीही शक्यता असते. हेलेनने ही ट्रीटमेंट फॉलो केली आणि यामुळे तिला कॅन्सर झाल्याचं लक्षात आलं. दरम्यान, स्कॅनिंगचा अहवाल आल्यानंतर डॉक्टरांनी तिला तिच्या शरीरात सुमारे 20 गाठी असल्याचं सांगितलं. मेलॅनोमा नावाचा कॅन्सर झाला असून, तो आता चौथ्या स्टेजला आहे, असं डॉक्टरांनी तिला सांगितलं. कॅन्सरची चौथी स्टेज म्हणजे रुग्णाचा मृत्यू निश्चित मानला जातो; पण हे समजल्यानंतरही हेलेन खचली नाही. तिनं इम्युनोथेरपी सुरू केली. सुमारे आठ महिने कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर तिची प्रकृती सुधारली. टिकटॉकवर ट्रेंडिंग व्हिडिओ पाहून त्यानुसार सौंदर्यासाठी ट्रीटमेंट घेताना हेलेनला कॅन्सरचं निदान झालं. एका अर्थाने तिचा जीव वाचण्यासाठी ही जुनी ब्युटी ट्रीटमेंट उपयुक्त ठरली.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात