जाहिरात
मराठी बातम्या / Viral / चमत्कार की नशीब! बंदुकीची गोळी आरपार झाली तरी जवानाला काहीच झालं नाही; Ukrainian Soldier चा Shocking Video

चमत्कार की नशीब! बंदुकीची गोळी आरपार झाली तरी जवानाला काहीच झालं नाही; Ukrainian Soldier चा Shocking Video

चमत्कार की नशीब! बंदुकीची गोळी आरपार झाली तरी जवानाला काहीच झालं नाही; Ukrainian Soldier चा Shocking Video

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनियन सैनिकाचा हा शॉकिंग व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

क्विव, 19 एप्रिल : रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज 55 वा दिवस आहे (Russia Ukraine War). रशियन सैन्य युक्रेनमध्ये सर्वत्र कहर करत आहे. युक्रेनही या हल्ल्यांना धैर्याने प्रत्युत्तर देत आहे. या युद्धाचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतात एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. याला नशीब म्हणावं की चमत्कार असाच प्रश्न सर्वांना पडला आहे (Smartphone saved ukrainian soldiers life). रशियन सैनिकांनी एका युक्रेनियन सैनिकावर बंदुकीची गोळी झाडली. ही गोळी आरपार गेली पण तरी या सैनिकाला काहीच झालं नाही. त्याचा जीव बचावला. या सैनिकाचा जीव नेमका कसा वाचला, नेमकं घडलं तरी काय, हा चमत्कार कसा झाला, हे या व्हिडीओत आहे. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. Raw Ukraine Videos युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता दोन युक्रेनी सैनिक आपसात बोलत आहेत. एक सैनिक बोलता बोलता आपल्या खिशात हात टाकतो आणि खिशातील फोन बाहेर काढतो. स्मार्टफोनमध्ये बंदुकीची गोळी घुसलेली दिसते आहे. हे वाचा -  चक्कर येऊन रेल्वे ट्रॅकवर कोसळली महिला; अंगावरुन संपूर्ण ट्रेन गेल्यावर जे घडलं ते पाहून सगळेच थक्क ही गोळी या सैनिकाच्या शरीरातून आरपार जाणार होती. पण त्याचं नशीब बलवत्तर म्हणून ती या स्मार्टफोनला लागली आणि तिथंच अडकली. गोळीचा आकार तब्बल तब्बल 7.62 मिमी असल्याचा सांगितला जातो आहे. जर ही गोळी स्मार्टफोनऐवजी सैनिकाच्या शरीराच्या आरपार गेली असती तर त्याचा मृत्यूही झाला असता. याचा अर्थ एका स्मार्टफोनमुळे सैनिकाचा जीव वाचला आहे. मृत्यू फक्त त्याला स्पर्श करून गेला.

युक्रेनमध्ये हिंसाचाराचे व्यापक परिणाम झाले आहेत. यामध्ये सैनिक आणि नागरिक दोघांनाही तितकाच फटका बसला आहे.  सोमवारी पश्चिम युक्रेनच्या ल्विव्ह शहरावर अनेक क्षेपणास्त्र हल्ले झाले. या स्फोटांमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, रशियन सैन्याने सुमारे 2000 लोक मारले आहेत.  रशिया युक्रेन युद्धाबाबत (Russia Ukraine War) सुरुवातीपासूनच असे बोलले जात आहे की ते दीर्घकाळ चालणार आहे. हे वाचा -  दिखाव्याच्या नादात तरुणासोबत भलतंच घडलं; BMW मधून पडून थेट रस्त्यावर आपटला, पाहा VIDEO दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता चर्चा (Peace Talks between Russia and Ukraine) घडवून आणण्याचे प्रयत्नही करण्यात आले, पण ते अयशस्वी ठरले. आता या सलोखा शांततेच्या प्रयत्नांची चर्चा ऐकायला मिळत नाही. युक्रेनच्या दोन वरिष्ठ शांतता वार्ताहरांना विषप्रयोग केल्याचा आरोप रशियावर आहे, अशा वातावरणात चर्चा होण्याची शक्यता नाही. त्याचवेळी, युक्रेन कोणत्याही प्रकारे शांततेसाठी तयार नाही आणि युद्धाचे कारण अजूनही शिल्लक असल्याचे रशियाचे म्हणणे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात