Home /News /viral /

बाबो! तब्बल 1 लाख 90 हजार रुपयाला Chips चा एक तुकडा; इतकं काय आहे त्यात खास पाहा

बाबो! तब्बल 1 लाख 90 हजार रुपयाला Chips चा एक तुकडा; इतकं काय आहे त्यात खास पाहा

ऑनलाईन विक्रीला ठेवण्यात आलेल्या या लाखो रुपयाच्या चिप्सच्या तुकड्याची सर्वत्र चर्चा आहे.

    लंडन, 12 मे :  सध्या पेट्रोल-डिझेलसह बऱ्याच खाद्यपदार्थांच्या किमतीही वाढल्या आहेत. अशात सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे ते चिप्स. एक चिप्स लाखो रुपये किमतीला ऑनलाइन विक्रीसाठी ठेवण्यात आलं आहे. या चिप्सची किंमत पाहूनच तुम्हाला चक्कर येईल. आश्चर्य म्हणजे हा चिप्सचा बॉक्स किंवा चिप्सचं पाकिट नाही तर चिप्सचा फक्त एक तुकडा आहे. जो सोन्यापेक्षाही महाग मिळतो आहे (Chips for 1 lakh 90 thousand rupees). सामान्यपणे आपण चिप्स खातो ते 5 रुपयांपासून मिळतात. म्हणजे चिप्सचं एक पाकीट असतं. ज्यात बरेच चिप्स असतात. त्यापेक्षा जास्त किमतीचे चिप्स घ्यायचे म्हटलं की त्यांची संख्या वाढते. मग आता पण लाखो रुपयांचे चिप्स म्हटलं तर बरेच चिप्सचा ढिगाराच आपल्या डोळ्यासमोर येईल. पण ऑनलाइन विक्रीला काढलेला लाखो रुपयांचा हा चिप्सचा एक तुकडाच आहे. जो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. याची किंमत तब्बल 2 हजार पाऊंड म्हणजे तब्बल एक लाख 90 हजार रुपये आहे.  हा चिप्स क्रीम आणि ऑनियन फ्लेव्हर्सचा आहे. आता चिप्सचा एक तुकडा इतका महाग का विकला जातो आहे, यात इतकं काय खास आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हा तुकडा ऑनलाइन विक्रीला काढणाऱ्या याच्या मालकाने याची माहिती दिली आहे. या चिप्सची विक्री करणारी व्यक्ती नेमकी कोण माहिती नाही. पण ती यूकेतील हाय वायकॉम्बेमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली आहे. हे वाचा - तोंडाला पाणी सुटण्याऐवजी चढला रागाचा पारा; Flying Dahi Vada Video पाहून भडकले नेटिझन्स त्याने दिलेल्या माहितीनुसार चिप्सचा हा तुकडा प्रिन्गल्स चिप्सच्या पॅकेटमधील आहे.  याची किंमत जास्त असण्याच कारण म्हणजे हे चिप्स खूप दुर्मिळ आहे,  किनाऱ्यावरून तो दुमडलेला आहे. त्याचे स्ट्राइप्स इतर भागाशी जुळतात. हा तुकडा कुठेच तुटलेला नाही आणि अगदी नवा आहे. दुर्मिळ म्हणून असे चिप्स इतक्या किमतीला विकण्याचं हे पहिलं प्रकरण नाही. याआधीही असे दुर्मिळ आकाराचे चिप्स ऑनलाईन विक्रीला ठेवण्यात आले आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Food, Lifestyle, Viral

    पुढील बातम्या