Home /News /viral /

Shocking Video : रस्त्यावरून चालताना विजेची तार तुटली; जागीच होरपळून 2 सख्ख्या भावांचा मृत्यू

Shocking Video : रस्त्यावरून चालताना विजेची तार तुटली; जागीच होरपळून 2 सख्ख्या भावांचा मृत्यू

कधी कुठे मृत्यू येईल काहीच सांगता येत नाही. ही सर्व घटना समोरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    अलीगड, 18 सप्टेंबर : अलीगडमधून एक धक्कादायक VIDEO (Shocking Video From Aligarh) समोर आला आहे. मृत्यू कधी येईल याचं काही सांगू शकत नाही. हसणाऱ्या चेहरा कधी कोणत्या अपघातामुळे तुमच्या डोळ्या आड होईल याचा  कोणी अंदाजही बांधू शकत नाही. रस्त्यावरून चालत असतानाही या दोन भावांचा जागीच मृत्यू होणं, हे अत्यंत दु:खकारक आहे. हे दोन मजूर रस्त्यावरुन चालत होते, तेवढ्यात हायटेन्शन लाइन तुटून (high tension line breaks) त्यांच्या अंगावर पडली. यानंतर जळून दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही मजुरांना करंट लागल्यामुळे जळून दोघांचा मृत्यू झाला. दोन्ही मजुरांना जळताना पाहून परिसरात एकच गोंधळ उडाला. तब्बल 11000 वोल्टेजच्या विजेच्या लाइनची तार तुटून खाली कोसळली. यातून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) समोर आलं आहे. दोन्ही भाऊ रस्त्याच्या कडेने जात होते. त्यादरम्यान हायटेन्शन लाइनची तार तुटली आणि दोन्ही भावांच्या अंगावर पडली. ज्यात ते विजेच्या तारेला चिकटले. आणि आग पेटली. आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झाला. दोघांच्या मृत्यूमुळे कुटुंबात शोककळा पसरली आहे. हे ही वाचा-रस्त्यावरील खांबाला हात लावताच 6 वर्षांच्या मुलाला विजेचा झटका;घटनेचा Live Video सिमेंटने भरलेल्या ट्रकने खांबाला धडक दिल्यानंतर हायटेन्शन लाइनची तार पडली होती. या घटनेचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. या बाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. (Shocking Video Electric wire breaks while walking on the road Two brothers died on the spot) काही दिवसांपूर्वी राजस्थानमधून अशीच एक घटना समोर आली होती. गावातील दोन मुलं रस्त्यावरुन जात होते. काही वेळापूर्वी गावात पाऊस झाला होता. दोघांपैकी एक मुलाने रस्त्यावरील विजेच्या खांबाला हात लावला. त्यानंतर काही सेकंदात मुलाला करंट लागला आणि तो खाली कोसळला. काही वेळानंतर त्याच्या शरीरातून धूर येऊ लागला. त्यावेळी काहीजण मुलाच्या मदतीसाठी धावले. त्यापैकी एक व्यक्ती लाकडाची फळी घेऊन आला व त्याने मुलाला खांबापासून दूर लोटलं. मात्र तोपर्यंत मुलगा बेशुद्ध झाला होता. सुदैवाने या घटनेत मुलाला वाचवण्यात यश आलं.  
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Death, Electrical wire, Shocking viral video, Uttar pradesh

    पुढील बातम्या