भोपाळ, 19 ऑगस्ट : मध्य प्रदेशातून भोपाळमधून एक अत्यंत भीतीदायक व्हिडीओ समोर आला आहे. लहान मुलांकडे लक्ष देणं गरजेचं असतं, कधी आपलं दुर्लक्ष झाल्यास मोठा अपघात घडू शकतो. यात मुलांच्या जीवावरही बेतू शकतं. असाच काहीसा प्रकार भोपाळ येथे घडला आहे. येथे दुसऱ्या मजल्यावरील रेलिंगसोबत एक चिमुरडी खेळताना दिसत आहे.
सुरुवातीला चिमुकडी व्यवस्थित खेळत होती. मात्र अचानक तिचा तोल सुटला आणि ती दुसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळली. चिमुरडी कोलांट्या उड्या मारतच खाली पडली. यादरम्यान खाली काही मुलं उभी होती. त्यांनी तातडीने मुलीच्या कुटुंबीयांना याबाबत कळवलं आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या चिमुरडीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना जहांगीराबाद येथील आहे.
Video पाहण्यासाठी क्लिक करा...
सध्या या चिमुरडीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दुसऱ्या मजल्यावरुन पडल्याने मुलगी बचावली आहे. मात्र यात तिला गंभीर दुखापत झाली आहे. सध्याच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात पालकांकडे मुलांकडे पूर्णवेळ लक्ष देणं शक्य होत नाही. मात्र तरीही अशा धोक्याच्या ठिकाणी जाण्यापासून मुलांना रोखायला हवं किंवा त्यांना आधीच याबाबतची समज देणं आवश्यक आहे. अन्यथा थोडंस दुर्लक्ष मुलांच्या जीवावर बेतू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.