जाहिरात
मराठी बातम्या / Viral / झूम मिटिंगमध्ये अचानक सुरु झाला अश्लील व्हिडीओ, घाबरलेल्या सदस्यांनी....

झूम मिटिंगमध्ये अचानक सुरु झाला अश्लील व्हिडीओ, घाबरलेल्या सदस्यांनी....

झूम मिटिंगमधील धक्कादाक प्रकार

झूम मिटिंगमधील धक्कादाक प्रकार

जगभरात कोरोनाचं संकट आल्यापासून सर्वच बदलून गेलं आहे. जवळपास सर्वच ऑनलाईन झालं आहे. अजूनही अनेक ऑफिसचं काम, मिटिंग या ऑनलाईनच होतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 30 एप्रिल : जगभरात कोरोनाचं संकट आल्यापासून सर्वच बदलून गेलं आहे. जवळपास सर्वच ऑनलाईन झालं आहे. अजूनही अनेक ऑफिसचं काम, मिटिंग या ऑनलाईनच होतात. ऑनलाईन मिटिंगवर अनेक वेगवेगळ्या घटना घडलेल्या समोर आल्या आहेत. यामध्ये मजेशीर, विचित्र, धक्कादायक घटनाही घडल्याच्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. अशातच ऑनलाईन मिटिंगदरम्यानची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झूमवर महत्त्वाच्या ऑनलाइन मीटिंग करणाऱ्या काही लोकांना अचानक स्क्रीनवर अश्लील व्हिडिओ दिसू लागल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण अमेरिकेचं असून सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

कोनी बेट आरोग्य केंद्राची झूम बैठक सुरू होती. लैंगिक आजारांच्या वाढत्या घटनांसंदर्भात आयोजित या बैठकीदरम्यान अचानक एक व्यक्ती अश्लील कृत्य करताना दिसली. ती व्यक्ती अश्लील आवाजही काढत होती. मध्यंतरी सभेत घाबरलेल्या सभासदांना कुठं बघावं हेच समजत नव्हतं. तो आधीच रेकॉर्ड केलेला व्हिडीओ असावा असं वाटलं. मीटिंगचे सूत्रसंचालन करणारी लुसी मुजिका डायझ रागाने म्हणाली - हे सर्व काय आहे? तसेच मिटिंगला उपस्थित असलेल्या लोकांनी लगेच मिटिंगमधून बाहेर पडायला सांगितलं. मीटिंगमध्ये उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने न्यूयॉर्क पोस्टला सांगितले, हा एक संपूर्ण अश्लील हॅक होता. बैठक हॅक झाली. ही मीटिंग ताबडतोब बंद करण्यात आली आणि दुसरी मिटिंग लिकंवर मिटिंग सुरु करण्यात आली. मिटिंग होस्टने सर्वांची माफी मागत मिटिंग हॉक झाल्याचं सांगितलं. हेही वाचा -  जगातील सर्वात धोकादायक फूटपाथ, इथे चालणारे होतात रक्तबंबाळ दरम्यान, कोविडच्या काळापासून ऑनलाइन झालेल्या अनेक सरकारी बैठका हॅक झाल्याची नोंद झाली आहे. दोन वर्षांपूर्वी, न्यूयॉर्क कौन्सिल इव्हेंटमधील मीटिंग 20 मिनिटांसाठी हॅक करण्यात आली होती आणि यामध्येही अश्लील व्हिडीओ चालवण्यात आले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात