अभिषेक जायसवाल, प्रतिनिधी वाराणसी, 6 जुलै : उत्तर प्रदेश राज्यातील बरेलीच्या एसडीएम ज्योती मौर्य सध्या चर्चेत आहेत. ज्योती मौर्य यांनी त्यांच्या पतीच्या प्रेमाचा अपमान करत त्यांची फसवणूक केल्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पीसीएस अधिकारी झाल्यानंतर ज्योती मौर्या यांनी पती आलोकची फसवणूक केली आणि दुसऱ्या अधिकाऱ्याशी जवळीक वाढवली, असा आरोप आहे. तर सोशल मीडियावरील सर्व बातम्यांदरम्यान आता त्यांच्या लग्नाची पत्रिकाही समोर आली आहे. लग्नाच्या पत्रिकेत ज्योतीचे पती आलोक मौर्य यांच्या नावापुढे ग्रामपंचायत अधिकारी असे लिहिले आहे. त्यामुळे आलोक हा सफाई कामगार आहे की ग्रामपंचायत अधिकारी?, असा प्रश्न आता समोर आला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी न्यूज 18 लोकलच्या टीमने एसडीएम ज्योती मौर्य यांच्या वडिलांचा शोध घेतला.
तपासात ज्योती मौर्या यांचे वडील पारसनाथ हे चिरईगांव, वाराणसी येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. व्हायरल झालेल्या कार्डवर पारसनाथ यांनी बोलणे टाळले. पण त्यानंतर त्यांनी फक्त लग्नाच्या वेळी आलोक मौर्य ग्रामपंचायत अधिकारी असल्याचे सांगितले. असे त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात आले. त्याच्या कुटुंबीयांनी लग्नपत्रिकेवरही हे लिहिले होते. परंतु आता तो चतुर्थ श्रेणी सफाई कामगार असल्याची सांगत आहे. हेही वाचा - DM Jyoti Mourya Case : पतीला सोडलेल्या त्या महिल्या अधिकाऱ्याविरोधात आणखी एक तक्रार, आता काय घडलं? ज्योतीचे वडील पारसनाथ पुढे म्हणाले की, ज्या लग्नाचा पाया हा खोटे बोलून रचला गेला त्याचे परिणाम काय असतील? त्यामळे ते सर्व फसवेगिरी करणारे आहेत. फक्त आलोकच नाही तर त्याचे संपूर्ण कुटुंब खोटे आहे. त्याचा मोठा भाऊ अशोक मौर्य हा देखील सफाई कामगार आहे. पण लग्नपत्रिकेवर त्याने स्वतःला शिक्षक असल्याचे सांगितले आहे. ज्योती मौर्य आणि आलोक मौर्य यांच्या लग्नाचे हे कार्ड 2010 चे आहे. पती आलोकचा आरोप काय - आलोकचा आरोप आहे की, त्यांनी पत्नी ज्योती मौर्याला प्रोत्साहन दिले आणि तिच्या अभ्यासात मदत केली, ज्यामुळे ती पीसीएस अधिकारी झाली. मात्र, पीसीएस अधिकारी झाल्यानंतर त्यांनी आलोक यांची फसवणूक केली. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. पण या सर्व प्रकरणामुळे ज्योती मौर्या संपूर्ण देशात प्रकाशझोतात आल्या आहेत. तसेच सोशल मीडियावर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.