• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • संजना गणेशननं शेअर केला डान्सचा VIDEO, फॅन्सनी विचारला बुमराहबद्दलचा प्रश्न

संजना गणेशननं शेअर केला डान्सचा VIDEO, फॅन्सनी विचारला बुमराहबद्दलचा प्रश्न

टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) आणि त्याची बायको संजना गणेशन (Sanjana Ganesan) हे दोघंही सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात.

 • Share this:
  मुंबई, 22 मे : टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) आणि त्याची बायको संजना गणेशन (Sanjana Ganesan) हे दोघंही सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील सीरिजच्या दरम्यान 15 मार्च रोजी या दोघांनी लग्न केले. त्यानंतर हे जोडपे सातत्याने एकमेकांसोबतचे अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करतात. स्टार स्पोर्ट्सची अँकर असलेल्या संजनाला आयपीएल स्पर्धा (IPL 2021) स्थगित झाल्यानं सध्या ब्रेक मिळाला आहे. या ब्रेकचा ती पूर्ण आनंद घेत आहे.  संजनानं नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. मैदानात किंवा स्टुडिओमध्ये क्रिकेटपटूंना नेमके प्रश्न विचारणारी संजना डान्समध्येही चांगलीच कुशल आहे. तिचा हा व्हिडीओ फॅन्समध्ये व्हायरल (Viral) झाला आहे. यावर काही फॅन्सनी जसप्रीत बुमराह कुठे आहे? असा तिला प्रश्न विचारला आहे.
  जसप्रीत बुमराहची इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियात निवड झाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final) आणि भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिजसाठी बुमराहवर टीम इंडियाची मोठी भिस्त आहे. बुमराहनं काही दिवसांपूर्वी संजनाच्या वाढदिवसानिमित्त एक गोड फोटो शेअर केला होता. MS Dhoni च्या एक्स-गर्लफ्रेंडचा सोशल मीडियावर धुमाकूळ, शेयर केले Hot Photos माझं रोज ऱ्हदय चोरणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू माझी आहेस. आय लव्ह यू (I Love You) बुमराहचं हे ट्विट आणि नव्या जोडप्याचा हा गोड फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral) झाला होता.
  Published by:News18 Desk
  First published: