कशाला हव्यात महागड्या मशीन! भाज्या सॅनिटाइझ करण्यासाठी इंडियन जुगाड; पाहा VIDEO

कशाला हव्यात महागड्या मशीन! भाज्या सॅनिटाइझ करण्यासाठी इंडियन जुगाड; पाहा VIDEO

फळं-भाज्या स्वच्छ, निर्जंतुक करण्यासाठी एका व्यक्तीने अशी भन्नाट आयडिया शोधून काढली ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) तुफान व्हायरल होतो आहे.

  • Share this:

मुंबई, 30 जुलै : कोरोनाव्हायरसच्या (coronavirus) या परिस्थितीत आपल्याला स्वच्छतेची इतकी सवय झाली आहे की, प्रत्येक वस्तू आपण स्वच्छ करून घेतो. हातांप्रमाणे वस्तू सॅनिटाइझ करण्यासाठी बाजारात आता वेगवेगळे सॅनिटायझरही उपलब्ध झाले आहेत. मात्र फळं-भाज्यांसाठी (fruit - vegetable) हे सॅनिटायझ (sanitize) वापरू शकत नाही. त्यामुळे आपण गरम पाण्यात भाज्या धुवून घेतो. मात्र यावरही एका व्यक्तीने जुगाड शोधून काढला आहे.

फळं-भाज्या स्वच्छ, निर्जंतुक करण्यासाठी एका व्यक्तीने अशी भन्नाट आयडिया शोधून काढली ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) तुफान व्हायरल होतो आहे. आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी आपल्या ट्वीटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो या व्यक्तीने प्रेशर कुकरच्या शिट्टीवर एक रबरी पाइप लावला आहे आणि पाइपचं दुसरं टोक त्याच्या हातातच आहे. त्याने ताटात बऱ्याच भाज्या आणि फळे ठेवली आहेत. जेव्हा शिट्टी होते तेव्हा त्यातून निघणारी वाफ ही व्यक्ती त्या फळं आणि भाज्यांवर सोडते.

"भाज्या निर्जंतुक करण्यासाठी हा मस्त असा इंडियन जुगाड आहे. ही पद्धत किती प्रभावी ठरेल हे मी सांगू शकत नाही. मात्र भारत खरंच अद्भूत आहे", असं ट्वीट साहू यांनी केलं आहे.

हे वाचा - लोकांपासून इतका लांब जाऊन बसला की इंटरनेटवर VIDEO भन्नाट व्हायरल

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांना हा जुगाड खूपच आवडला आहे. तर काही जणांनी कुकरच्या वाफेनं अशा भाज्या अशा सॅनिटाइझ करणं धोक्याचं ठरू शकतं, गंभीर दुखापत होऊ शकते, अशी चिंता व्यक्त केली आहे. तसंच काही जणांनी ही पद्धत व्हायरसचा नाश करण्यासाठी पुरेशी नाही असं म्हटलं आहे.

Published by: Priya Lad
First published: July 30, 2020, 7:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading