मॉस्को, 25 जुलै : तुम्हाला चेस किंवा बुद्धिबळ खेळायला आवडत असेल तर तुम्ही त्याच्या मॅचेस किंवा स्पर्धाही पाहिल्या असतीलच. काही स्पर्धा या रोबोटसोबतही खेळवल्या जातात. असाच रोबोटसोबत चेस खेळताना रोबोटने एका चिमुकल्याचं बोट तोडलं आहे. बुद्धिबळ स्पर्धेतील हे भयंकर दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो (Robot break boy finger while playing chess). बुद्धिबळ म्हणजे बुद्धीचा खेळ, जो एका जागेवर बसून खेळला जातो त्यामुळे यात मैदानी खेळांप्रमाणे शारीरिक दुखापत होत नाही. पण बुद्धिबळाचा हा व्हिडीओ पाहून मात्र तुमच्या अंगावर काटा येईल. रोबोटसोबत बुद्धिबळ खेळणाऱ्या अवघ्या 7 वर्षांच्या मुलाचं रोबोटने बोट मोडलं आहे. रोबोटसोबत बुद्धिबळ खेळणं म्हणजे बुद्धीसाठी मोठं आव्हान तर आहेच पण आता जीवासाठी धोकादायक ठरू शकतं, असाच प्रश्न हा व्हिडीओ पाहून उपस्थित होतो. हे वाचा - VIDEO - पाचव्या मजल्यावरून कोसळूनही बचावली 2 वर्षांची चिमुकली; खिडकीतून खाली पडताच झाला चमत्कार व्हिडीओत पाहू शकता, रोबोट आणि मुलगा आमनेसामने आहेत. रोबोट आपला डाव खेळतो आणि प्रतिस्पर्धी मुलाची एक सोंगटी बाहेर काढतो. त्यानंतर मुलगा आपली चाल खेळायला जातो. त्याच वेळी रोबोट त्याचं बोट पकडतो. मुलगा आपलं बोट सोडवण्यासाठी धडपडतो, त्याच्या आजूबाजूला असलेले काही लोक त्याच्या मदतीला धावून येतात आणि त्याचं बोट रोबोटच्या तावडीतून सोडवतात.
All acquisition that advanced AI will destroy humanity is false. Not the powerful AI or breaching laws of robotics will destroy humanity, but engineers with both left hands :/
— Pavel Osadchuk 👨💻💤 (@xakpc) July 21, 2022
On video - a chess robot breaks a kid's finger at Moscow Chess Open today. pic.twitter.com/bIGIbHztar
रशियाच्या मॉस्कोमधील ही घटना आहे. दोन आठवड्यांपूर्वी ही बुद्धीबळाची स्पर्धा झाली. तास न्यूज एजेन्सीशी बोलताना मॉस्को चेस फेडेरेशनच्या अध्यक्षा सर्गेई लाजरेव यांनी सांगितलं, रोबोटने मुलाचं बोट तोडलं, हे खूप वाईट आहे. याआधी या रोबोटसोबत मॅच खेळताना अशी कोणतीच दुर्घटना झाली नाही आहे. त्यामुळे ऑपरेटर्सनेच हे पाहिलं नसावं. रोबोटला चाल चालण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. मुलाने घाई केली आणि रोबोटने त्याचं बोट पकडलं. हे वाचा - VIDEO - बापरे! सर्कसमध्ये ट्रेनरवरच अस्वलाचा भयंकर हल्ला; जीव वाचवण्यासाठी धडपडला पण… माहितीनुसार मुलगा दुसऱ्या दिवशी खेळ खेळण्यात सक्षम होता, टूर्नामेंटच्या शेवटच्या दिवशी त्याने आपला गेम पूर्ण केला. या घटनेनंतर रोबोटबाबत लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. एका युझरने कॉम्प्युटरशी जिंकण्याचा कधी प्रयत्न करू नये, अशी कमेंटही केली आहे.

)







