जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पुरुषांनो, तुमच्या बायकोला खुश करायचं असेल तर 'हे' काम नक्की शिका! Video

पुरुषांनो, तुमच्या बायकोला खुश करायचं असेल तर 'हे' काम नक्की शिका! Video

पुरुषांनो, तुमच्या बायकोला खुश करायचं असेल तर 'हे' काम नक्की शिका! Video

अनेक घरांमध्ये संध्याकाळी महिला ऑफिसमधून थकून घरी आल्यानंतर स्वयंपाक करतात; पण आता हळूहळू हा ट्रेंड बदलू लागलाय.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 4 एप्रिल : एक चांगला जोडीदार बनण्यासाठी, चांगला पती बनण्यासाठी पत्नीला स्वयंपाकघरातील कामात मदत करणं आणि तेथील जबाबदाऱ्या बरोबरीनं वाटून घेणं महत्त्वाचं आहे. खरं तर स्वयंपाकघरातील कामं ही महिलांची जबाबदारी आहे, असं आजही अनेक घरांमध्ये मानलं जातं. अनेक घरांमध्ये संध्याकाळी महिला ऑफिसमधून थकून घरी आल्यानंतर स्वयंपाक करतात; पण आता हळूहळू हा ट्रेंड बदलू लागला असून, ही सकारात्मक गोष्ट आहे. स्वयंपाकघरात केवळ महिलांनीच स्वयंपाक तयार करायचा, ही परंपरा बदलण्याची जबाबदारी काही पुरुषांनी उचलेली दिसतेय. सध्या सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट वेगानं व्हायरल होतेय. ज्यामध्ये   तुम्हाला तुमचं वैवाहिक नातं चांगलं ठेवायचं असेल, तर तुम्ही स्वयंपाक शिकला पाहिजे.’ असा संदेश एका ब्लॉगरनं पुरुषांना दिला आहे. सोशल मीडियावरील व्हिडिओ चर्चेत ब्लॉगर मधूर सिंह यांनी एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये दिसतं की, मधुर सिंह त्यांच्या आईसोबत स्वयंपाकघरात रात्रीचं जेवण बनवायला शिकत आहेत. ही पोस्ट करताना त्यांनी लिहिलं आहे की, ‘मी माझ्या आईकडून स्वयंपाक शिकत आहे, जेणेकरुन मी तिच्या भावी सुनेला रात्री ऑफिसमधून आल्यावर दररोज चांगलं जेवण देऊ शकेन.’ मधूर सिंह हे व्हिडिओमध्ये पीठ मळताना, पोळ्या बनवताना, भाजी बनवताना दिसत आहेत. टॉवेल न धुता तुम्ही किती वेळ वापरू शकता? टॉवेलचं हे सत्य धक्कादायक ब्लॉगर मधूर सिंह यांनी व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये महिलांना उद्देशून लिहिलं आहे की, ‘महिलांनो, तुम्ही सोमवारी संध्याकाळी कामावरून घरी परत आल्यानंतर तुमच्यासाठी स्वादिष्ट अन्न बनवू शकेल, असा व्यक्ती शोधा.’ तर, पुरुषांना उद्देशून त्यांनी लिहिलं आहे की, ‘जंटलमन, तुम्ही पण स्वयंपाक शिका. कारण तुमच्या जोडीदाराला आनंदी ठेवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.’

    जाहिरात

    जबाबदाऱ्या शेअर करा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मधुर सिंह यांनी ही पोस्ट करताना सांगितलं आहे की, ‘पुरुषांनी किमान स्वयंपाकघरातील पुरेसं काम शिकलं पाहिजे, जेणेकरून ते ऑफिसमधून घरी परतलेल्या त्यांच्या थकलेल्या पत्नीसाठी स्वादिष्ट जेवण बनवू शकतील. पत्नी घरी येऊन रात्रीचं जेवण बनवले, यासाठी वाट पाहण्यापेक्षा स्वतःच रात्रीचं जेवण बनवणं शिकावं,’ असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मधूर सिंह यांनी पत्रकार म्हणून काम केलं आहे. ते प्रसिद्ध ट्रॅव्हल ब्लॉगर असून त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ThePlacardGuy नावानं अकाउंट प्रसिद्ध आहे. ते वेगवेगळे अनुभव त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत असतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात