नवी दिल्ली, 25 जुलै : जंगलामध्ये एकापेक्षा एक भयानक प्राणी वास्तव्य करतात. त्यामुळे शिकार करण्याविषयी तर बोलायलाच नको. तुम्हाला अनेक धोकादायक शिकारी पहायला मिळतील. खास करुन जंगलाच्या राजाला आणि राणीला तर माणसांप्रमाणेच जंगलातील अनेक प्राणी घाबरुन राहतात. त्यांच्या शिकारी हल्ल्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही आत्तापर्यंत पाहिले असतील. मात्र कधी त्यांचा क्युट अंदाजातील व्हिडीओ पाहिलाय का? सध्या जंगलाच्या राणीचा एक क्युट अंदाजातील व्हिडीओ समोर आलाय जो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हास्य उमटेल. जंगालाची राणी आपल्या मुलांसोबत फिरायला चालली आहे. यावेळीची त्यांची झलक कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. हा व्हिडीओ अनेक नेटकऱ्यांचं मन जिंकत असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
समोर आलेल्या व्हिडीओ तुम्ही पाहू शकता, सिंहीण तिच्या कुटुंबासह फिरायला निघाली आहे. काही पिल्ले तिच्या मागे चालत आहेत तरी काही पुढे. सिंहिण पिल्लांना योग्य मार्गाने चालण्याचं सांगत आहे. मुलांचा खोडसाळ अंदाज आणि सिंहिणीचा क्युट अंदाज अनेकांची मनं जिंकत आहे.
लेटेस्टक्रुगर नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही वेळातच हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला. व्हिडीओवर अनेक मजेशीर कमेंट पहायला मिळत आहे. दरम्यान, यापूर्वीही जंगलातील प्राण्यांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये कधी भयानक तर कधी मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतात. प्राण्यांच्या व्हिडीओंविषयी लोकांना कायमच कुतुहल वाटतं. त्यामुळे असे व्हिडीओ, फोटो झपाट्याने इंटरनेटवर व्हायरल होतात.