मुंबई, 13 जुलै : सोशल मीडियावर विविध प्रकारचे फोटो व्हायरल होतात.अनेक फोटो ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच भ्रमित करणारे असतात, तर काही फोटोंमध्ये कोडी असतात, जी सोडवणं प्रत्येकाला शक्य होत नाही. तुम्हालाही असे फोटो आणि त्यात दडलेली कोडी सोडवायला आवडत असतील तर आम्ही तुमच्यासाठी एक फोटो आणला आहे. या फोटोत तुम्हाला एक सिच्युएशन दिली जाईल. त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. फोटो पाहून तुम्हाला त्यातून बाहेर पडणं सोपं वाटत असलं तरी ते तितकं सोपं नाही. सोशल मीडियावर मेंदूला विचार करायला भाग पाडतील, असे फोटो व्हायरल होतात. या फोटोत आपल्याला विविध वस्तू शोधाव्या लागतात, किंवा लपलेले प्राणी पक्षी शोधावे लागतात. पण, आज आम्ही जो फोटो तुमच्यासाठी आणलाय, तो वेगळा आहे. नो कॉन्टेक्स्ट ह्युमन्स (@HumansNoContext) नावाच्या अकाउंटवरून हा फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडिया युजर्स या फोटोमध्ये खूप इंटरेस्ट घेत आहेत. फोटो पाहिल्यानंतर प्रत्येकाने आपापले तर्क लावून वेगवेगळी उत्तरं दिली आहेत. आता तुमचा नंबर आहे, तर तुम्ही हा फोटोतील सिच्युएशन सोडवायला तयार आहात का? रेस्टोरंटमधील 5 लोकांपैकी एक आहे महिलेचा खूनी, 10 सेकंदात शोधून काढू शकता? सर्वात आधी तुम्ही या फोटोत काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. दोन मुलं आणि एक मुलगी एका टेबलाजवळ उभे आहेत ज्यावर 2 सफरचंद ठेवली आहेत. सोबत एक सुरी ठेवलेली दिसतेय. प्रत्येकजण गांभीर्याने विचार करत आहे की सफरचंदांचं वाटप कसं होणार? तुम्हालाही तेच सांगायचं आहे. हे चॅलेंज सोडवल्याने तुमच्या मेंदूचा व्यायाम तर होईलच शिवाय तुमचा IQ देखील सुधारेल. चला तर तुम्हीही तुमचं डोकं वापरा आणि उत्तर शोधा.
ट्विटरवर हा फोटो व्हायरल होताच लोकांनी आपापल्या पद्धतीने उत्तरं द्यायला सुरुवात केली. एका युजरने तर चॅट जीपीटीला या कोड्याचं उत्तर विचारलं आणि तेच ट्विटरवर कमेंट केले. तो म्हणाला, एक सफरचंद दुसऱ्याच्या वर ठेवा. नंतर चाकूने मधून कापा. दोन्ही कापलेले भाग वेगळे करा. अर्धा भाग घ्या आणि बाजूला ठेवा. आता, तुमच्याकडे एक संपूर्ण सफरचंद आणि एक अर्धं सफरचंद राहील. अर्धं सफरचंद दोन समान भागांमध्ये कापा. अशा प्रकारे, प्रत्येक व्यक्तीला एक पूर्ण आणि पाव सफरचंद असं सारख्या प्रमाणात सफरचंद मिळेल.