जाहिरात
मराठी बातम्या / Viral / विमानाचा दरवाजा हवेत अचानक उघडला, धक्कादायक Video ने खळबळ

विमानाचा दरवाजा हवेत अचानक उघडला, धक्कादायक Video ने खळबळ

विमानातील धक्कादायक व्हिडीओ

विमानातील धक्कादायक व्हिडीओ

अनेक लोक विमानाने प्रवास करतात. मात्र दिवसेंदिवस विमानातील अनेक विचित्र घटना समोर येत आहेत. विमानात कधी काय घडेल आणि कोण काय करेल काही सांगू शकत नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 जून : अनेक लोक विमानाने प्रवास करतात. मात्र दिवसेंदिवस विमानातील अनेक विचित्र घटना समोर येत आहेत. विमानात कधी काय घडेल आणि कोण काय करेल काही सांगू शकत नाही. त्यामुळे काही लोकांच्या मनात विमानाने प्रवास करण्याची भिती बसलीय. अशातच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आलीये जी वाचून तुम्हालाही धक्का बसेल. एका विमानाचा दरवाजा हवेत उघडला. ही धक्कादायक घटना सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. विमानातील प्रवाशानं या घटनेचा व्हिडीओ शूट केला असून तो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.

News18लोकमत
News18लोकमत

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की, प्रवाशी विमानात बसले आहेत. मात्र जोरादार हवा सुरु आहे. व्हिडीओच्या पुढे विमानाचा दरवाजा उघडलेला दिसतोय. हे दृश्य फारच भयानक आहे. खरंतर ही घटना ब्राझीलमधून समोर आलीये. एका विमानाचा मालवाहू दरवाजा अचानक हवेतच उघडला. हे विमान 12 जूनला साओ लुईसमधून साल्वाडेरला जात होते.

जाहिरात

@aviationbrk नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 27 सेकंदांचा हा व्हिडीओ खूपच भयानक असून पाहूनच अंगावर काटा येत आहे. शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ब्राझिलियन गायक आणि गीतकार टिएरीही या विमानात उपस्थित होते. हा व्हिडीओ व्हायरल होताच इंटरनेटवर एकच खळबळ उडाली. व्हिडीओवर अनेक कमेंट येताना दिसत आहेत. लोक निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात