नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी : सध्या एक व्यक्ती नग्न अवस्थेत फिरत असल्यामुळे चर्चेत आली आहे. एक व्यक्ती अनेक दिवसांपासून रस्त्यावर विना कपड्यांशिवाय फिरत असल्यामुळे यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. न्यायालयाने याविषयी ऐतिहासिक निर्णय दिल्याचं पहायला मिळालं. याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
Alejandro Colomar चे वय 29 वर्ष आहे. अलादियामध्ये तो नग्नावस्थेत फिरताना आढळून आल्याने तो प्रकाशझोतात आला. यानंतर कनिष्ठ न्यायालयाने त्याला दंड ठोठावला. हे आपल्या स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे, असे कोलोमर यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले होते. विशेष म्हणजे तो फक्त शूज घालून खालच्या कोर्टात पोहोचला. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, कोलोमारने सांगितले की, तो 2020 पासून कपड्यांशिवाय फिरत आहे. काहींनी त्यांना पाठिंबा दिला तर काहींनी त्याच्यावर टीका केली.
Alejandro Colomar poses naked in his vegetable garden on Friday, February 3, as a Spanish court has ruled in favor of allowing him to continue walking around his village naked, as he has been doing since 2020, in Aldaia, near Valencia, Spain. 📷 Eva Manez/Reuters pic.twitter.com/O9mSwa7OfS
— Rappler (@rapplerdotcom) February 4, 2023
व्हॅलेन्सिया कोर्टाने या प्रकरणी ऐतिहासिक निकाल दिला. कोलोमरच्या न्यूड रोमिंगमुळे शांतता, सार्वजनिक सुव्यवस्था आणि नागरी सुरक्षेला कोणताही अडथळा येत नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे.अलादियामध्ये तो दोनदा कपड्यांशिवाय फिरताना आढळला होता. कोर्टाने कोलोमरच्या बाजूने निर्णय दिला आणि सांगितले की तो कपड्यांशिवाय त्याच्या गावात फिरू शकतो.
कोलोमरचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. तो कपड्यांशिवाय शेताच्या मधोमध सायकल चालवतानाही दिसला. एकदा त्याला चाकू दाखवून धमकावण्यात आल्याचे त्याने सांगितले होते. विशेष म्हणजे 1988 पासून स्पेनमध्ये सार्वजनिक नग्नता कायदेशीर आहे. इथे कोणीही कपड्यांशिवाय रस्त्यावर फिरू शकतो. पण वॅलाडोलिड आणि बार्सिलोनामध्ये नग्नतेबाबत कडक कायदे आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media, Social media troll, Viral, Viral news