मराठी बातम्या /बातम्या /Viral /

शेपटी, पाय खेचून खेचून बिबट्यासारख्या खतरनाक प्राण्याचाही घेतला जीव; माणसांच्या संतापजनक कृत्याचा VIDEO VIRAL

शेपटी, पाय खेचून खेचून बिबट्यासारख्या खतरनाक प्राण्याचाही घेतला जीव; माणसांच्या संतापजनक कृत्याचा VIDEO VIRAL

माणसांनी बिबट्याची केली भयंकर अवस्था.

माणसांनी बिबट्याची केली भयंकर अवस्था.

बिबट्याचा छळ करणाऱ्या माणसांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

    मुंबई, 18 ऑगस्ट : बिबट्या, चित्ता यांनी माणसांवर हल्ला केल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. हे मुके जीव आपलं पोट भरण्यासाठी शिकार करतात. पण या हिंस्र प्राण्यांपेक्षाही माणसाचं हिंसक रूप समोर आलं आहे. अशा खतरनाक प्राण्याचाही छळ करून करून माणसांनी त्याचा जीव घेतला आहे. एका बिबट्यासोबत माणसांनी केलेल्या संतापजनक कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एरवी माणसांना तुम्ही श्वानासारख्या साध्या प्राण्याचा छळ करताना पाहिलं असेल पण आता तर माणसांनी क्रूरतेची हद्दच पार केली. बिबट्यासारख्या खतरनाक प्राण्यालाही त्यांनी सोडलं नाही. एका तरुणाने चित्त्याचे पाय-शेपटी धरून, त्याचा शारीरिक छळ केला. त्याने त्याला इतकं छळलं की या चित्त्याचा मृत्यू झाला आहे, असं या व्हिडीओत नमूद केलं आहे. हे वाचा - VIDEO - शिकार करणाऱ्या खतरनाक मगरीलाच चावला झेब्रा; काही मिनिटांतच खेळ खल्लास आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक बिबट्या रस्त्यावरून जाताना दिसतो आहे. त्याचवेळी एक तरुण आपल्या एका हातात त्या बिबट्याचा एक पाय आणि एका हातात त्याची शेपटी धरतो. चित्ता त्या तरुणाच्या तावडीतून सुटण्यासाठी आपली संपूर्ण ताकद लावतो. पण तरुणाने त्याला इतकं घट्ट पकडलं आहे की चित्ता काही त्याच्या तावडीतून सुटत नाही. बिबट्यासारख्या प्राण्याच्या चेहऱ्यावरही भीती, थकवा दिसतो आहे. तो इतका घाबरला आणि थकला आहे की त्रास देणाऱ्या या माणसांवर पलटवार करण्याचा सोडा स्वतःला वाचवण्याचीही ताकद त्याच्यात उरली नाही आहे. यावरूनच या माणसांनी त्या बिबट्याची काय आणि किती भयंकर अवस्था केली ती दिसते. हे वाचा - शत्रूचा खात्मा करायला जाताना जवानाच्या मार्गात अचानक आला खतरनाक किंग कोब्रा; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO यातील जनावर कोण तुम्हीच सांगा असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही असंही कासवान यांनी सांगितलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या