तैपेई सिटी, 5 फेब्रुवारी : आपल्यापैकी अनेकांना घरात पाळीव प्राणी पाळण्याची आवड असते. काही लोक घरात कुत्रे आणि मांजर पाळतात, तर काही लोक पक्षीही पाळतात. अशाच एका व्यक्तीने आपल्या आवडीचा पोपट पाळला होता. मात्र, त्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागली. ही घटना तैवानमध्ये घडली आहे. मात्र, जो कोणी याबद्दल ऐकत आहे, त्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
आपल्या पाळीव पोपटाने काय करामत केली आहे? याची मालकाला अजिबात कल्पना नव्हती. मात्र, पोपटाने केलेल्या कृत्याचा मालकाला मोठा फटका बसला आहे. त्याचा खिसा तर हलका झालाच पण तुरुंगातही जावं लागलं आहे. त्याचं झालं असं की संबंधित व्यक्तीकडे असलेला पोपट आकाराने खूप मोठा असून खोडकरही आहे. अशा परिस्थितीत पोपटाच्या मालकाला त्याच्या गैरवर्तनाची शिक्षा भोगावी लागली. पोपटाने मारलेल्या व्यक्तीची हाडेही फ्रॅक्चर झाली आहेत. यावरुन तुम्ही पोपट काय करामतीचा असेल याचा अंदाज लावू शकता.
वाचा - वेगाने पळणाऱ्या कारच्या छतावर बसलाय कुत्रा, Video पाहून नेटकरी भडकले
पोपटाच्या फटक्याने व्यक्ती थेट हॉस्पिटलमध्ये
तैनान नावाच्या ठिकाणी, हुआंग आडनाव असलेली एक व्यक्ती राहते, ज्याने दोन पाळीव पोपट पाळले आहेत. पोपटांचा व्यायाम आणि उडण्याची सवय राहावी यासाठी ते रोज त्यांना घराबाहेर उद्यानात फिरायला घेऊन जातात. दरम्यान, एका पोपटाने पंखांनी जॉगिंग करणाऱ्या व्यक्तीला इतकं घाबरवलं की तो कोसळलाच. या अपघातामुळे त्याच्या हिपचा सांधा हलला आणि हाडही तुटले. त्याला थेट रुग्णालयात जावे लागले. रिकव्हर होण्यासाठी 6-7 महिने लागले. जखमी व्यक्तीने पोपटाच्या मालकावर खटला भरला.
मालकाला भरावा लागला 75 लाखांचा दंड
40 सेमी लांब आणि 60 सेमी पंख असलेल्या पोपटाच्या या कृत्यामुळे न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. हा पोपट मालकाचा निष्काळजीपणा असल्याचे न्यायालयाने मान्य केले. अशा परिस्थितीत त्याला 3.04 मिलियन नवीन तैवान डॉलर्स म्हणजेच 75 लाख रुपये दंड आणि 2 महिने तुरुंगात राहण्याची शिक्षा सुनावण्यात आली. सध्या पोपटाचा मालक या निर्णयाविरोधात अपील करणार आहे. कारण, त्याला हा दंड जास्त वाटत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.