Home /News /viral /

चालकाशिवाय आपोआप चालू लागली पार्किंगमधील बाईक; Horror film मधील नाही हा रिअल Shocking video

चालकाशिवाय आपोआप चालू लागली पार्किंगमधील बाईक; Horror film मधील नाही हा रिअल Shocking video

स्कूटीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही.

  मुंबई, 11 मे : चालकाशिवायच गाडी चालत असल्याचे सीन तुम्ही हॉरर फिल्ममध्ये पाहिलेच असतील. पण प्रत्यक्षात असं कधी पाहिलं आहे. नाही ना? मग आता तुमचं हृदय घट्ट करा आणि सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणारा व्हिडीओ (Viral Video) पाहा. ज्यामध्ये तुम्हाला असं दृश्यं दिसणार आहे, जे तुम्हाला एखाद्या हॉरर फिल्ममधील वाटेल पण ते रिअल आहे (Scooty Shocking Video). स्कूटी असो वा बाईक की आणि किकवर चालणारी. पण हे करायला एखादा माणूस तर लागतो. पण या व्हिडीओत दिसणारी बाईक माणसाशिवायच आपोआप सुरू झाली (Parked Motorcycle Apparently Moving On Its Own). सोशल मीडियावर स्कूटीचा असा  व्हिडीओ (Bike video) व्हायरल होतो आहे, जो पाहून तुम्ही शॉक व्हाल. तुमच्या अंगावरच काटा येईल. हा शॉकिंग व्हिडीओ (Shocking Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओत पाहू शकता, रस्त्यावर पार्किंगमध्ये काही गाड्या आहेत. तिथंच एक स्कूटी पार्क केलेली आहे. स्कूटीजवळ कुणीच दिसत नाही आहे. अचानक स्कूटी आपोआप सुरू होते. ती मागे येते. गोलाकार फिरते आणि पुन्हा जिथं पार्क केली होती तिथं जाऊन थांबते. हे वाचा - भरधाव कारच्या धडकेत ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे आणि ड्रायव्हर...; अपघाताचा धडकी भरवणारा VIDEO पार्किंगमधील बाईक अशी अचानक सुरू होण्याची ही पहिली घटना नाही. याआधीही असाच एक व्हिडीओ समोर आला होता. @Amberological ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता.
  व्हिडीओत पाहू शकता, रस्त्यावर पार्किंगमध्ये काही बाईक आहे. तिथं एकही माणूस नाही. काही वेळात एक बाईक आपोआप सुरू होते आणि ती चालू लागते. बाईक सुरू होऊ टर्न घेते आणि अंतर चालतेही आणि नंतर ती जमिनीवर कोसळते. ही घटना सीसीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमधील तारखेनुसार ही घटना डिसेंबर 2020 मधील आहे.  हा व्हिडीओ शेअर करणाऱ्यानंदेखील कॅमेऱ्यात कैद झालं नाहीतर विश्वासच बसला नसता, असं कॅप्शन दिलं आहे. हे वाचा - OMG! चक्क माकडांनी सुसाट पळवली Bike; Rider Monkeys चा Video पाहून थक्क व्हाल कोणत्या हॉरर फिल्ममधील सीन वाटावा असेच हे व्हिडीओ आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण शॉक झाले आहेत. कुणी याला चमत्कार म्हटलं आहे तर कुणी याचा संबंध भूताशी जोडला आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Shocking viral video, Vehicles, Viral, Viral videos

  पुढील बातम्या