मुंबई, 04 ऑगस्ट : आकाशात उंच उडायला कुणाला आवडणार नाही. विमानाने आपण आकाशात पोहोचतो खरं पण पक्ष्यासारखं उडावं असंही आपल्याला वाटतं. यासाठी स्काय डायव्हिंग केलं जातं. पॅराशूटच्या मदतीने हवेत उडता येतं. पण जरा विचार करा स्कायडायव्हिंग करता करता अचानक पॅराशूटचं काही झालं तर… असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका स्कायडाइव्हरने विमानातून उडी मारली आणि त्याचवेळी पॅराशूटचा हवेत गुंता झाला. त्यानंतर कित्येक फूट उंचावर आकाशात स्कायडाइव्हर आपला जीव वाचवण्यासाठी धडपडू लागला. त्याच्या डोक्यावर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात हे थरकाप उडवणारं दृश्य कैद झालं. हा व्हिडीओ पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल. तुमच्या हृदयाची धडधड वाढेल. हे वाचा - VIDEO - 80 वर्षीय आजोबांच्या एका वारातच दरोडेखोरांचा खेळ खल्लास; दुकान लुटायला आले पण जीव मुठीत धरून पळाले व्हिडीओत पाहू शकता स्कायडाइव्हरने उडी मारल्यानंतर काही वेळात पॅराशूटचा गुंता होतो. स्कायडाइव्हरही त्यामध्ये अडकत जातो. तो किती फूट उंचावर आहे ते या व्हिडीओतून दिसूनच येतं. पॅराशूट बंद होताच तो वाऱ्याच्या वेगाने गरागरा गोल फिरताना दिसतो. त्यानंतर जीव वाचवण्यासाठीत्याची धडपड सुरू होते. स्वतःला वाचवण्यासाठी तो शक्य ते सर्व प्रयत्न करतो.
त्याच्याकडे एक इमर्जन्सी पॅराशूट असतं. ते खोलण्याचा तो बराच वेळ प्रयत्न करतो. अवघ्या काही वेळातच तो वेगाने जमिनीच्या जवळ येतो. सुदैवाने तो जमिनीवर आपटणार तोच काही सेकंदआधीच त्याच्याकडील इमर्जन्सी पॅराशूट उघडतं. तरी ही व्यक्ती किती वेगाने जमिनीवर आदळते ते तुम्ही पाहूच शकता. जमिनीवर सुखरूप पोहोचताच स्कायडाइव्हरसह आपल्या सर्वांच्याही जीवात जीव येतो. स्कायडाइव्हर सुटकेचा निश्वास सोडतो. त्याचा ओरडण्याचा आवाजही या व्हिडीओत येतो. पण इतक्या मोठ्या दुर्घटनेमुळे त्याला गंभीर दुखापत नक्कीच झाली असावी. हे वाचा - चालत्या कारमधून रस्त्यावरून पडली चिमुकली; मागून भराभर गाड्या आल्या आणि…; धक्कादायक VIDEO हा व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे हे माहिती नाही. @TheFigen ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्यक्तीचं नशीब चांगलं होतं म्हणून तो बचावला, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ पाहून अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं आहे. व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत.

)







