Home /News /viral /

'जर भारत असता तर...'; पाकिस्तानातील 8 वर्षांच्या मुलाचा VIDEO पाहून भडकले नेटिझन्स

'जर भारत असता तर...'; पाकिस्तानातील 8 वर्षांच्या मुलाचा VIDEO पाहून भडकले नेटिझन्स

लहान मुलाचं टॅलेंट पाहून मोजक्या लोकांना कौतुक वाटतं आहे पण बहुतेक लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

    कराची, 26 एप्रिल : लहान मुलांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता लहान मुलं म्हणजे क्युट असतात त्यामुळे त्यांचे व्हिडीओही तितकेच क्युट असतात. त्यामुळे हे व्हिडीओ सर्वांना आवडतात. चिमुकल्यांचे व्हिडीओ पाहून नेटिझन्सनही त्यांचं कौतुक करतात. पण सध्या सोशल मीडियावर एका मुलाचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून मात्र नेटिझन्स भडकले आहेत (Pakistan 8 year old child driving video). अवघ्या 8 वर्षांचा हा मुलगा आहे. आपल्या बहिणीसोबत तो या व्हिडीओत दिसत आहे. सुरुवातीला हे दोघं कॅमेऱ्यासमोर उभं राहून बोलताना दिसतात. त्यावेळी मुलीच्या हातात सेल्फी स्टिक दिसते. त्यानंतर व्हिडीओत एक कार दाखवली जाते. ही टोयोटो फॉर्चुनर आहे. त्यानंतर मुलगा त्या गाडीत जाऊन बसतो. पण तो चक्क ड्रायव्हिंग सीटवर बसताना दिसतो. हौस म्हणून हा मुलगा सुरुवातीला असंच ड्रायव्हिंग सीटवर बसला असावं असं तुम्हाला वाटेल. पण पुढे जे घडलं ते पाहून तुम्ही हैराण व्हाल. हा मुलगा चक्क ती कार चालवतो. तो ड्रायव्हिंग करताना दिसतो.  मुलगा सुरुवातीला एका मैदानात कार पळवताना दिसतो. पण तिथं जवळच रस्त्यावरून गाड्याही जात असल्याचं दिसतं आहे. थोडी जरी चूक झाली तरी मोठा अपघात होऊ शकतो. यानंतर हा मुलगा थेट रस्त्यावरच गाडी चालवतो. रस्त्यावर टर्न घेतानाही दिसतो. पुढे काही वेळाने ती मुलगी त्या मुलासोबत कारमध्ये दिसते आणि नंतर एक प्रौढ व्यक्ती या मुलाच्या शेजारी गाडीत बसलेली दिसते. सुरुवातीला सेल्फी स्टिकचा वापर करणाऱ्या या मुलीच्या हातात काहीच दिसत नाही. या दोघांचा व्हिडीओ दुसरा कुणीतरी रेकॉर्ड करताना दिसतं. याचा अर्थ त्यांचा व्हिडीओ कुणीतरी दुसरं रेकॉर्ड करतं आहे. म्हणजे त्यांच्यासोबत इतर बरेच लोक आहेत. पण त्यांनी या मुलांना असं करण्यापासून रोखत नाही तर उलट प्रोत्साहन दिलं आहे. सामान्यपणे ड्रायव्हिंग करण्याचं वय हे 18 वर्षे आहे. तरी अशा प्रौढ व्यक्तींकडूनही अपघात होतात. असं असताना लहान मुलांच्या हातात गाडीचं स्टेअरिंग देणं म्हणजे धोकादायकच आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही मोजक्या लोकांनी या मुलांचं कौतुक केल्याचं दिसतं आहे. पण भारतीय मात्र हा व्हिडीओ पाहून भडकले आहेत. एका युझरने, "हा भारत असता तर या मुलाच्या वडिलांना आतापर्यंत अटकही झाली असती", असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मुलांना ड्रायव्हिंगसाठी प्रोत्साहन देणं याला न्यूज 18 लोकमतही पाठिंबा देत नाही.  तुम्हीही तुमच्या मुलांना प्रसिद्धीसाठी किंवा हौस, इच्छा म्हणून इतक्या कमी वयात ड्रायव्हिंग करायला बिलकुल देऊ नका असं आवाहनही आम्ही तुम्हाला करतो.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos, While driving

    पुढील बातम्या