नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी जेल भरो आंदोलन सुरू केले आहे. या अंतर्गत पंजाब प्रांताची राजधानी लाहोरमध्ये पीटीआयचे कार्यकर्ते आणि समर्थक रस्त्यावर उतरले असून, ही गर्दी वाढत चालली आहे. लोकांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. याचे अनेक व्हिडीओ फोटो सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. विदेशी कर्जामुळे पाकिस्तान गरिब झाल्याचं दिसून येत आहे. हे कर्ज भरण्याचा विचार न करता हे सरकार जनतेवर कर लादत आहे. त्यामुळे महागाई एवढी वाढली आहे की, जनता हंबरडा फोडत आहे. जनतेला मदत करण्याऐवजी आणि देशाला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याऐवजी येथील नेते पुन्हा एकदा सत्तापालटाच्या तयारीला लागले आहेत. जेलो आंदोलन सुरु झाले असून यामुळे पंजाब प्रांताची राजधानी लाहोरमध्ये पीटीआयचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.
ایسا پہلی دفعہ ہو رہا ہے کہ پولیس میگا فون پر گرفتاریوں کے لئے اپیل کر رہی ہے 😄 پلیز گرفتاری دینے کے لئے قیدیوں کی گاڑیوں میں بیٹھ جائیں 😇 کچھ دیر میں پتہ چل جائے گا کہ کون کون سی جیل کہاں تک بھری ہے؟ pic.twitter.com/HYQihU1x1D
— Hamid Mir حامد میر (@HamidMirPAK) February 22, 2023
गर्दी वाढत असून पोलिसांनी लोकांना म्हटलं की, ज्यांना ज्यांना अटक व्हायचंय त्यांनी गाडीत येऊन बसा. भोंगा लावून पोलीस हा आग्रह करताना दिसत आहे. याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यामुळे सध्या इम्रान खानला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे.
दरम्यान, इम्रान खानच्या बोलण्यावर जे काही सुरु आहे यामुळे लोक अक्षरशः आतून तुटल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सध्या पाकिस्तानमध्ये खूप वाईट परिस्थिती असल्याचं दिसून येत आहे. व्हायरल व्हिडीओवरही खूप प्रतिक्रिया पहायला मिळत आहे.