Home /News /viral /

Optical Illusion: मेंदूला द्या ताण अन् शोधा कॉफीच्या बियांमध्ये लपलेला पुरुषाचा चेहरा, सापडला तर लगेच करा कमेंट

Optical Illusion: मेंदूला द्या ताण अन् शोधा कॉफीच्या बियांमध्ये लपलेला पुरुषाचा चेहरा, सापडला तर लगेच करा कमेंट

Optical Illusion:  मेंदूला द्या ताण अन् शोधा कॉफीच्या बियांमध्ये लपलेला पुरुषाचा चेहरा, सापडला तर लगेच करा करा कमेंट

Optical Illusion: मेंदूला द्या ताण अन् शोधा कॉफीच्या बियांमध्ये लपलेला पुरुषाचा चेहरा, सापडला तर लगेच करा करा कमेंट

इंटरनेटवर (Internet) अनेक फोटोज, पेटिंग व्हायरल होत असतात. असाच एक ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) असलेला फोटो इंटरनेट व्हायरल होत आहे. या फोटोत कॉफी बिन्समध्ये (coffee beans ) एक माणूस लपला आहे, बघा तुम्हाला शोधता येतोय का?

मुंबई,23 मे:  इंटरनेटवर (Internet) अनेक फोटोज, पेटिंग व्हायरल होत असतात. त्यापैकी वैशिष्ट्यपूर्ण फोटोज, पेटिंग्ज यूजर्स शेअर करत असतात. अलीकडे ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) हा नवा प्रकार इंटरनेटवर जोरदार व्हायरल (Viral) होताना दिसतो. काही विशिष्ट फोटो किंवा पेटिंगमध्ये ऑप्टिकल इल्युजन हा प्रकार वापरला जातो. डोळ्यांपुढे काहीसा संभ्रम निर्माण करणाऱ्या फोटो किंवा पेटिंगच्या अनुषंगाने काही प्रश्नांची उत्तरं विचारली जातात. यामागे मनोरंजनासह विचारांना चालना देणं हे प्रमुख उद्दिष्ट असतं. सध्या असाच एक ऑप्टिकल इल्युजन असलेला फोटो इंटरनेट व्हायरल होत आहे. यात मोठ्या प्रमाणात कॉफीच्या बिया (Coffee Beans) दाखवल्या गेल्या असून, त्यात पुरुषाचा चेहरा शोधून दाखवण्याचं आव्हान दिलं जात आहे. यातून तुमचा मेंदू (Brain) किती कार्यक्षम आणि विकसित आहे, हे तुम्हाला जाणून घेता येणार आहे. `टाइम्स नाऊ न्यूज`ने याविषयीची माहिती दिली आहे. इंटरनेटवर सध्या कॉफीच्या बियांचा ऑप्टिकल इल्युजन असलेला फोटो व्हायरल होत असून त्या बियांमध्ये लपलेला पुरुषाचा चेहरा ओळखून दाखवा, असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी अत्यंत सूक्ष्म निरीक्षण करा आणि चेहरा शोधण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो, यावर लक्ष ठेवा असं सांगितलं जात आहे. हा फोटो बारकाईनं पाहिल्यास कॉफीच्या बियांमध्ये लपलेला पुरुषाचा चेहरा दिसू शकेल. पण शोधूनही चेहरा सापडत नसेल तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला काही हिंट देतो. या फोटोच्या खालच्या अर्ध्या भागावर लक्ष केंद्रित करा. यात कॉफीची एक बी जवळपास माणसाच्या चेहऱ्यासारखी दिसेल. त्यामुळे या भागातील प्रत्येक बी कडे निरखून पहा. या फोटोमुळे ऑप्टिकल इल्युजन म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल, ऑप्टिकल इल्युजन असलेल्या फोटो किंवा पेटिंगकडे पाहिल्यानं आपल्या मेंदू आणि डोळ्यांमध्ये कोणत्या क्रिया होतात, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असले. कॉफीच्या बियांच्या फोटोसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी ऑप्टिकल इल्युजनविषयी माहिती करून घेऊया. ऑप्टिकल इल्युजन म्हणजे काय? ऑप्टिकल इल्युजन हे केवळ आकार बदलणाऱ्या प्रतिमा आणि संभ्रम निर्माण करणारे रंग यांचा समावेश असलेले केवळ गूढ ब्रेन टीझर (Brain Teaser) नाहीत. यातून दृष्टी परिक्षणाच्या माध्यमातून तुमचा मेंदू कसा कार्य करतो, याविषयी बरंच काही सांगता येतं. मेंदूच्या डावा भाग अधिक वापरणाऱ्या व्यक्ती या अंतर्ज्ञानी, जिज्ञासू असलेल्या मेंदूचा उजवा भाग अधिक वापरणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक विश्लेषणात्मक आणि तार्किक विचार करणाऱ्या असतात. तथापि, अ‍ॅबस्ट्रॅक्ट इमेजेसचा (Abstract Images) तुम्ही जो अर्थ लावलेला असतो, त्यावर आधारित माहितीचं परिणामकारक रिव्हर्स इंजिनीअरिंग करण्याचं काम म्हणजे ऑप्टिकल इल्युजन. आपण एखादा फोटो किंवा पेटिंग कसं पाहतो यावरून आपल्या मेंदूची आणि व्यक्तिमत्त्वाची प्रमुख वैशिष्ट्य स्पष्ट होत असतात. त्यामुळे ही गोष्ट खरोखरच मनोरंजक ठरते. तुमच्याकडे अधिक विश्लेषणात्मक मेंदू आहे की तुलनेनं सर्जनशील मन आहे, हे निष्कर्ष तुमच्या मेंदूवर कोणत्या हेमिस्फेअरचं वर्चस्व असतं यावरून ठरवता येऊ शकतं. ‘द माइंड्स जर्नल’च्या मते, तुमच्या मेंदूचा उजवा अर्धा भाग सरासरीपेक्षा अधिक विकसित आहे, पूर्ण विकसित आहे, हळूहळू कार्य करतो की नाही या गोष्टी तुम्ही विशिष्ट ऑप्टिकल इल्युजन पाहून जाणून घेऊ शकता. कॉफीच्या बियांच्या फोटोतील पुरुषाचा चेहरा शोधताना या सर्व बाबी तुम्हाला जाणवतील. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही पुरुषाचा चेहरा तीन सेकंदात ओळखू शकलात तर तुमचा उजवा मेंदू तुमच्या समवयस्कांपेक्षा अधिक विकसित आहे असं समजावं. आणि जर तुम्ही पुरुषाचा चेहरा तीन सेकंद ते एक मिनिटाच्या कालावधीत ओळखला तर तुमच्या मेंदूचा उजवा अर्धा भाग पूर्णपणे विकसित आहे, असा निष्कर्ष निघतो. जर हा एक्सरसाईज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एक ते तीन मिनिटांचा अवधी लागला तर तुमच्या मेंदूची उजवी बाजू हळूहळू माहितीचं विश्लेषण करत आहे. आणि जर तुमच्यासाठी तीन मिनिटं पुरेशी नसतील तर अशा ब्रेन टीझरच्या माध्यमातून तुमच्या मेंदूला आव्हान देणं सुरू ठेवायला हवं, असा निष्कर्ष काढता येतो, असं द माइंड्स जर्नलने म्हटलं आहे. त्यामुळे तुम्हाला अजून पुरुषाचा चेहरा सापडला नसेल तर शोधून काढा आणि सापडला असेल तर वरचे निष्कर्ष लावून बघा.
First published:

Tags: Viral photos

पुढील बातम्या