Home /News /viral /

बाबो! 1.3 कोटी रुपयांना विकली गेली एक नोट; इतकं काय आहे यात खास

बाबो! 1.3 कोटी रुपयांना विकली गेली एक नोट; इतकं काय आहे यात खास

Only one currency note sold for Rs 1.3 crore : या नोटेला त्याच्या मूल्याच्या 1400 पट अधिक किंमत मिळाली आहे.

लंडन, 19 मे : दुर्मिळ नोटा-नाणी जमवण्याचा छंद अनेकांचा असतो. काही लोक एखादं नाणं किंवा नोट लकी समजतात. अशा नोट आणि नाण्यांचे ऑनलाईन लिलावही होतात (Currency note auction). ज्यासाठी लोक लाखो रुपये मोजतात. अशीच एक नोट सध्या चर्चेत आली आहे, जी तब्बल 1.3 कोटी रुपयांना विकली गेली आहे. ज्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. कोट्यवधी रुपयांना विकल्या गेलेल्या या एका नोटेत इतकं काय खास आहे, हेच जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना आहे (Only one currency note sold for Rs 1.3 crore). लंडनच्या स्पिंक ऑक्शन हाऊसमध्ये या नोटेचा लिलाव करण्यात आला. एका चॅरिटी दुकानात एका बॉक्समध्ये ही नोट सापडली. पॉल वायमन नावाच्या व्यक्तीला ऑक्सफॅममध्ये वॉलिटिअरिंग करताना दान केलेल्या वस्तूंच्या बॉक्समध्ये ही नोट दिसली. त्यानंतर त्याने एका ऑक्शन हाऊसशी संपर्क केला. जिथं तज्ज्ञांनी याचं मूल्यांकन £30,000 (30000 पाऊंड) केलं. पॉल वायमन म्हणाला, माझ्या हातात असं काही आहे, जे नक्कीच दुर्मिळ आहे, असं मला वाटलं होतं. जेव्हा ही नोट £140,000 विकली गेली तेव्हा मला विश्वासच बसला नाही. लिलाव करणाऱ्यांनी याचं मूल्य £30,000 ठरवलं. पण जेव्हा त्याचा लिलाव झाला तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला. हे वाचा - अद्भुत! पाण्याबाहेर काढताच जिवंत मासा 'काच' बनला; चमत्कारिक VIDEO VIRAL 28 एप्रिलला या नोटेचा ऑनलाईन लिलाव झाला. जगभरातील लोकांनी या नोटेसाठी बोली लावली. तेव्हा नोटेला त्याच्या मूल्याच्या 1400 पट अधिक किंमत मिळाली आहे. तब्बल  £1,40,000 ला म्हणजे 1.3 कोटी रुपयांना ही नोट विकली गेली. मिररच्या रिपोर्टनुसार ही नोट एक फिलिस्तीन पाऊंड आहे. ही नोट फिलिस्तानी नोट आहे. £100 (जवळपास 1 हजार रुपये) फिलिस्तानी पाऊंड. 1927 साली फिलिस्तानात ब्रिटिशकाळात ही नोट जारी करण्यात आली. ही नोट खूप दुर्मिळ आहे. हे वाचा - जगातील सर्वात लांब Sky Bridge! शेकडो फूट उंचीवर झुलणारा पूल पाहूनच वाढतील ठोके या नोटेच्या लिलावातून मिळालेली रक्कम ऑक्सफॅमच्या धार्मिक कार्यांसाठी वापरली जाणार आहे. ऑक्सफॅममार्फत ही नोट शोधणाऱ्या पॉल आणि ब्रेंटवूड शॉप टीमचे आभार मानण्यात आले आहेत.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Money, Viral, Viral news

पुढील बातम्या