नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी : तंत्रज्ञान, सोशल मीडियामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. ऑनलाईन गोष्टींमुळे खूप कामे सहजरित्या होत आहेत. मात्र याचा अनेकजण गैरवापर करतानाही दिसून येतात. सावधगिरी बाळगली नाही तर अनेकांची फसवणूकदेखील होत आहे. आत्तापर्यंत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यांच्यासोबत फसवणूकीचे प्रकार घडले आहेत. असाच काहीसा फसवणूकीचा विचित्र प्रकार समोर आला असून एका व्यक्तीला 84 लाखांचा गंडा बसला आहे. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या या व्यक्तीचं नाव मार्क रॉस असून तो 54 वर्षाचा आहे. मार्क हा एक आयटी कामगार आहे. त्याने एका क्लिकवर 84 लाख रुपये गमावले. त्याला क्रिप्टोकरन्सीची ऑफर आली होती ज्यामध्ये त्याला गुंतवणुकीऐवजी जास्त पैसै देणार असल्याचं सांगितलं. मात्र त्याच्या खात्यामध्ये काहीच पैसै आले नाही. हेही वाचा - उत्खननात सापडली चक्क 5000 वर्षे जुनी बिअरची रेसिपी! अजून जे सापडलं ते वाचून व्हाल चकित या प्रसंगाविषयी मार्कने सांगितलं, या फसवुकीमध्ये मी सर्वस्व गमावले. माझ्याकडे रोख रक्कम नव्हती. मी एक पिता आहे आणि माझ्याकडे घराचे पैसे देण्यासाठीही पैसै नव्हते. यामुळे मला माझ्या वृद्ध पालकांसोबत रहावं लागलं. मी इथे राहिलो आणि नंतर मला दुसरी नोकरी मिळाली. पण माझी सर्व बचत संपली आहे. कोरोना काळात त्याने सर्व पेन्शन खात्यातून काढली होती. जी त्याने फसवणुकीमध्ये गमावली.
मार्कने सांगितलं, एक वर्षापूर्वी टेलिग्रामवर बोनस सपोर्टचा व्हिडीओ पाहिला होता. तो संशयास्पद वाटला मात्र बऱ्याच लोकांना यातून चांगले पैसै मिळाले. त्यांच्याशी त्यांनी बोलण्यासही लावले होते. मात्र आता असं वाटत आहे की ही सर्व खाती त्यांनी बनावट तयार केली होती. मी सर्व बचत या स्कॅममध्ये लावून मोठी चूक केली. जर आई-वडिल नसते तर तो रस्त्यावर आला असता. ही घटना सोशल मीडियावर चर्चेत आली असून तुम्हीदेखील अशा फसवणूकीचे बळी ठरु शकता. त्यामुळे कुठेही पैसै लावण्यावेळी सावधावता बाळगणं गरजेचं आहे.