न्यू जर्सी : बऱ्याचदा हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये अजब कारणांनी निर्बंध लावले जातात. काही दिवसांपूर्वी साडी नेसून येणाऱ्या महिलेला रेस्टॉरंटमध्ये निर्बंध लावण्यात आले आणि त्यावरुन चांगलाच वाद रंगला होता. बऱ्याचदा लोकांवर विचित्र निर्बंध लादल्याचे अनेकदा दिसून आलं आहे. अमेरिकेतील न्यू जर्सी येथील एका लोकप्रिय इटालियन रेस्टॉरंटने १० वर्षांखालील मुलांना खाण्यावर बंदी घातली आहे. शुक्रवारी सोशल मीडियावर जाहीर केले की ते यापुढे 8 मार्चपासून 10 वर्षाखालील मुलांना रेस्टॉरंटमध्ये येण्यासाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. आउटलेटने फेसबुकवर आपला निर्णय जाहीर केला. एका फेसबुक पोस्टमध्ये, रेस्टॉरंटने म्हटले की, “आम्हाला लहान मुले आवडतात. पण अलीकडच्या काळात त्यांच्याशी जुळवून घेण्याचं मोठं आव्हान आहे. उंच खुर्च्या, त्यांना बसायला जागा नसणे आणि रेस्टॉरंटमधील एकूण स्थिती पाहता त्यांना न येणं योग्य ठरेल असंही म्हटलं आहे. रेस्टॉरंटमध्ये आजूबाजूला जाणाऱ्या मुलांची जबाबदारी आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आल्याचं रेस्टॉरंटने जाहीर केलं. अलीकडच्या काही घटनांमुळे आम्हाला हे नवीन धोरण लागू करण्यास भाग पाडले आहे.
8 मार्चपासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. हा निर्णय त्रासदायक आणि कठीण आहे. आमचा व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी हा निर्णय योग्य असल्याचं रेस्टॉरंटने म्हटलं आहे. लहान मुलांमुळे इथे काम करणं कठीण होतं. असंही या रेस्टॉरंटने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. या पोस्टला 16 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर 4500 हून अधिक युजर्सने ही पोस्ट शेअर केली आहे. या अजब फतव्याची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.