नवी दिल्ली, 25 मे : सध्या उन्हाळा सुरु असून सर्व लोक गरमीने हैराण झाले आहेत. बहुतांश ठिकाणी तीव्र उष्णतेनं अनेकांना जीवदेखील गमवावा लागला. एवढ्या उन्हात बाहेर पडणंही नागरिकांसाठी कठिण झालं आहे. लोक गरमी आणि कडक उन्हापासून वाचण्यासाठी अनेक युक्त्या शोधत आहे. उन्हापासून वाचण्यासाठी केलेले जुगाड सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. या जुगाडू व्हिडीओमध्ये आणखी एक भर पडली आहे. उन्हापासून वाचण्यासाठी एका वृद्ध व्यक्तीनं केलेला जुगाड सध्या चर्चेत आला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती कडक उन्हात रस्त्यावर सायकल चालवताना दिसत आहे. उन्हाच्या तीव्रतेपासून वाचण्यासाठी या व्यक्तीने सायकलभोवती जुगाड लावून लाकडी चौकट बनवली आहे. ज्याखाली छोटे टायर बसवले आहेत. ज्यामुळे व्यक्तीला सायकल चालवताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.
दुसरीकडे, त्या व्यक्तीने लाकडी चौकटीच्या वर कापड ठेवले आहे. त्यामुळे रस्त्यावरून चालताना उन्हापासून आराम मिळेल. असा जुगाड पाहून सर्वच थक्क झाले आहेत. त्यामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर 31 हजारांहून अधिक लाइक्स आणि 22 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहे.
दरम्यान, @technology_world_09 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ काही वेळातच खूप व्हायरल झाला. व्हिडीओवर अनेक कमेंट येताना दिसत आहे. व्यक्तीचा जुगाड पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. यापूर्वीही असे अनेक जुगाडू व्हिडीओ समोर आले आहेत. उन्हापासून वाचण्यासाठी तर लोक अजून वेगवेगल्या युक्त्या शोधून काढत आहे.