मराठी बातम्या /बातम्या /Viral /बसमध्ये जागा न मिळाल्याने महिलेचं मोठं पाऊल, केलं असं काही की ड्रायव्हरलाच जावं लागलं बाहेर

बसमध्ये जागा न मिळाल्याने महिलेचं मोठं पाऊल, केलं असं काही की ड्रायव्हरलाच जावं लागलं बाहेर

व्हायरल

व्हायरल

दैनंदिन जीवनात लोक खूप धावपळ करताना दिसतात. बस, गाडी, टॅक्सी, ट्रेन या माध्यमातून लोक दिवसभरातील प्रवास करत असतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 18 मार्च : दैनंदिन जीवनात लोक खूप धावपळ करताना दिसतात. बस, गाडी, टॅक्सी, ट्रेन या माध्यमातून लोक दिवसभरातील प्रवास करत असतात. मात्र अनेकवेळा बस, ट्रेन याठिकाणी गर्दी सर्रास आढळते. जागा मिळवण्यासाठी लोकांमध्ये तुंबड हाणामारी, धक्काबुक्कीदेखील पहायला मिळते. अनेकजण अनोखे फंडे आजमावत जागा मिळवतात. असे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतााही दिसतात.

सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक महिलेने बसमध्ये जागा मिळवण्साठी जे काही केले ते पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल. महिलेच्या कारनाम्यानंतर सर्वत्र एकच गोंधळ उडाला. ही घटना राजस्थानमधील असून याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.

व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक बस उभी राहिली असून त्यामध्ये ड्रायव्हरच्या जागी एक महिला बसली आहे. बसचा ड्रायव्हर खाली उभा असून तो महिलेला त्याच्या जागेवरुन उठण्यास सांगत आहे. मात्र महिलेला बसमध्ये बसण्यासाठी जागा नसल्यामुळे ती ड्रायव्हरच्या जागी बसली असल्याचं सांगते. ती त्या जागेवरुन उठण्यास नकार देते. त्यामुळे आजपासचे लोकही ही घटना पहायला लागतात. सर्वत्र एकच गोंधळ उडतो. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

दरम्यान, @mishradeoki नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असून त्याच्यावर खूप साऱ्या कमेंटदेखील येत आहेत. व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. दिवसभरात अशा अनेक घटना घडत असतात. बसमध्ये अनेकांना बसण्यासाठी काय उभं राहण्यासाठीही जागा मिळत नाही.

First published:

Tags: Top trending, Travel, Video viral, Viral, Viral news