जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हिला म्हणे तैमूरशी लग्न करायचंय; नोरा फतेहीची इच्छा ऐकून करीनाही झाली अवाक

हिला म्हणे तैमूरशी लग्न करायचंय; नोरा फतेहीची इच्छा ऐकून करीनाही झाली अवाक

हिला म्हणे तैमूरशी लग्न करायचंय; नोरा फतेहीची इच्छा ऐकून करीनाही झाली अवाक

एका कार्यक्रमात नोरा फतेहीनं (Nora fatehi) एक विचित्र मागणी करीनासमोर (Kareena kapoor) ठेवली. तिनं करीनाचा मुलगा तैमूरशी (Taimur) लग्न (Marriage) करण्याचा प्रस्ताव ठेवला. हे ऐकून करीनालाही धक्काच बसला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 08 जानेवारी: बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर (Kareena kapoor) सध्या गरोदर (Pregnant) आहे. गरोदर असली तरी बेबो तिच्या वर्क कमिटमेंट्स पूर्ण करताना दिसत आहे. करीना कपूर काही दिवसांपूर्वी ‘लाल सिंह चड्ढा’ या आगामी चित्रपटाच्या शुटिंगसाठी गेली होती. या चित्रपटात ती बॉलीवूड अभिनेता आमिर खानसोबत (Aamir Khan) दिसणार आहे. याशिवाय ती तिच्या चॅट शोचे एपिसोडही शूट करताना दिसली आहे. अलीकडेच या चॅट शोमध्ये प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही (Nora fatehi) आली होती. यावेळी तिनं आपली विचित्र मागणी करिनासमोर ठेवली. नोरानं करीनाचा मुलगा तैमूरशी (taimur) लग्न (Marriage) करण्याचा प्रस्ताव करीनासमोर ठेवला. हे ऐकून करिनालाही धक्काच बसला. खरंतर नोरा फतेहीने करीना कपूरचा चॅट शो ‘वॉट वीमेन वॉन्ट’ या कार्यक्रमात बर्‍याच रंजक गोष्टी शेअर केल्या आहेत. या संभाषणादरम्यान नोरानं अचानक तैमूरशी लग्न करण्याची इच्छा करीनासोबत बोलून दाखवली. नोरा म्हणाली- ‘मला आशा आहे की जेव्हा तैमूर मोठा होईल तेव्हा आम्ही लग्न आणि एन्गेजमेंटबद्दल विचार करू शकतो’. हे ऐकून करिनालाही आश्चर्याचा धक्का बसला आणि करीना हसत म्हणाली - ‘तो आता फक्त चार वर्षांचा आहे आणि त्यासाठी तुला बराच काळ वाट पाहावी लागेल’. हे ऐकून, नोरा देखील विनोदीपणाने म्हणाली- ‘ठीक आहे मी प्रतीक्षा करेन’. करीना आणि नोरा यांचं हे मनोरंजक संभाषण येथे पहा-

जाहिरात

या मुलाखतीदरम्यान नोरानं तिच्या सुरुवातीच्या काळात इंडस्ट्रीमधील विविध अडचणींचा सामना कसा करावा लागला, हेही सांगितलं. नोरानं असंही सांगितलं की, एका कास्टिंग डायरेक्टरनं तिला बोलावून केवळ ओरडून नकारच नाही दिला तर अपमानजनक शब्दही वापरले. या घटनेनंतर ती घरी जावून खूप रडली. यामुळेच तिनं आपला संघर्ष सुरू ठेवला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात