Home /News /viral /

तान्हुला झाला सोशल मीडियावर SUPERHIT; हा PHOTO ठरला कारण...

तान्हुला झाला सोशल मीडियावर SUPERHIT; हा PHOTO ठरला कारण...

कोरोना (Corona)च्या काळात मास्क लावणं आवश्यक आहे. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचा मास्क काढणाऱ्या तान्ह्या बाळाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या डॉक्टरांप्रमाणे आपल्या सगळ्यांच्याच चेहऱ्यावरचा मास्क लवकरात लवकर दूर होईल अशी अपेक्षा करुया !

पुढे वाचा ...
  मुंबई 15 ऑक्टोबर:  कोरोना (Corona) काळात आपल्या सगळ्यांनाच चेहऱ्यावर मास्क लावून घराबाहेर पडण्याची सवय झाली आहे. कोरोनाचं संक्रमण थांबवण्यासाठी मास्क हा उत्तम पर्याय आहे. असं मानलं जातं. या आधी मास्कचा वापर फक्त वैद्यकीय क्षेत्रातील लोकंच करत होते. पण आता मास्क तुमच्या आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मास्क वापरणं अनेकांना आजही आवडत नाही. कधी एकदा कोरोनावर लस (Corona Vaccine) येते आणि विनामास्क घराबाहेर पडण्याचा अनुभव घेता येतोय असं अनेकांना वाटत असेल. कोरोनानिमित्त डॉक्टरच्या चेहऱ्यावरुन मास्क काढणाऱ्या बाळाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral Photo) होत आहे. तान्ह्या बाळाने जन्मल्यावर लगेचच डॉक्टरांच्या चेहऱ्यावरुन मास्क खेचून काढण्याचा प्रयत्न केला असा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो यूएईच्या डॉक्टर समीर चेएब यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यावर त्यांनी एक कॅप्शनही लिहलं आहे की, "हा फोटो म्हणजे एक संकेत आहे. आपल्या चेहऱ्यावरुन लवकरच मास्क निघेल !"
  डॉक्टरच्या चेहऱ्यावरुन मास्क काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाळाचा फोटो जुनाच असला तरी सध्या तो सोशल मीडियावर हिट झाला आहे. या फोटोवर हजारो लाइक्स आणि अनेक अनेक कॉमेंट्स आल्या आहेत. हा म्हणजे सकारात्मक संकेत असल्याचं काहींनी म्हटलं आहे. तर "हा फोटो म्हणजे 2020 वर्षाचा चेहरा आहे" अशा कॉमेंट्स काहींनी केल्या आहेत. लवकरच आपल्या चेहऱ्यावरुन मास्क कायमचा दूर होईल आणि आपलं हास्य आधीसारखंच सगळ्यांना दिसेल अशी अपेक्षा करुया !
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Corona, Mask, Viral photo

  पुढील बातम्या