मराठी बातम्या /बातम्या /Viral /...अन् आईच्या डोळ्यातून घळाघळा वाहणारं पाणी कायमचं थांबलं! ओंकारची अनोखी कहाणी

...अन् आईच्या डोळ्यातून घळाघळा वाहणारं पाणी कायमचं थांबलं! ओंकारची अनोखी कहाणी

जाणून घ्या ओंकार आणि त्याच्या आईची अनोखी कहाणी....

जाणून घ्या ओंकार आणि त्याच्या आईची अनोखी कहाणी....

जाणून घ्या ओंकार आणि त्याच्या आईची अनोखी कहाणी....

मुंबई, 13 एप्रिल : आई..! हा शब्द उच्चारताच अंगावर काटा उभा राहतो. हळूच डोळ्याची काठ ओली होते. तिचं नसणं जिव्हारी लागतं. लहानपणी कायम आपल्या अवती भोवती फिरणाऱ्या आईचं खरं महत्त्व ती डोळ्यांसमोर नसते तेव्हाच जाणवतं. कधी कधी वाटतं मोठ्यापणीदेखील लहानपणाप्रमाणे आईवर निस्वार्थी, जिवापाड, स्वत:ला विसरून प्रेम करायला हवं. तिला जगाचं सुख आणि आनंद मिळवून द्यावा. तिच्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ देऊ नये.

बीड (Beed News) तालुक्यातील ओंकार शिंदेला आईच्या डोळ्यातून वाहणारं पाणी कायमच थांबवायचं होतं. आईला होणारा त्रास त्याला पाहावत नव्हता. त्यामुळे आईच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ नये यासाठी हा पठ्ठ्या कामाला लागला. आणि आईसाठी म्हणून एक अजब वस्तू तयार केली. आज देशभरात ओंकारचं कौतुक (positive story) केलं जात आहे. मात्र त्याच्या हातून घडलेल्या या निर्मितीमागे प्रेरणा म्हणून त्याची आईच होती.

हे ही वाचा-'3 Idiots' वाल्या रिअल लाईफ 'Phunsuk Wangdu' ला भेटले आनंद महिंद्रा; फोटोचं कॅप्शन वाचून वाटेल अभिमान

नवी उमेद या सामाजिक संस्थेने यासंदर्भातील माहिती सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे. जाणून घ्या ओंकार आणि त्याच्या आईची अनोखी कहाणी....

ओंकार अनिल शिंदे, बीड तालुक्यातल्या कुर्ला गावातला. शेतमजूर कुटुंबातला. जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीत शिकणारा. दुसऱ्या दिवशी शाळेत पोहोचताच त्यानं राणे सरांना गाठलं. भाऊसाहेब राणे त्याचे विज्ञानाचे शिक्षक. ''सर माझी आई रोज रडते. कांदा चिरताना पाणी येतंच म्हणते ती.''

आईबद्दल वाटणारी ओंकारची काळजी बघून सरांना ओंकारचं कौतुक वाटलं. त्यांनी त्याला सविस्तरपणे समजावून सांगितलं. कारण तर कळलं, पण मग उपाय काय ... ओंकारनं शोध घ्यायला सुरुवात केली. मार्गदर्शन करायला राणे सर होतेच. त्यातूनच कांदा कापताना डोळ्यात पाणी येणार नाही, असा स्मार्ट चाकू तयार केला.

कांदा आम्लयुक्त गुणधर्माचा. कांद्याची पीएच व्हॅल्यू पाच ते सहाच्या दरम्यान असून कांदा कापल्यानंतर त्याच्या पेशी तुटतात. त्याच्यामधून गंधकयुक्त द्रव्य बाहेर पडते. तो मुळात बाष्पनशील असल्यामुळे हवेत तरंगून हवेमध्ये पसरून डोळ्यापर्यंत पोचतो. डोळ्यातील पाण्याशी त्याचा संयोग झाल्यानंतर आम्ल तयार होतं आणि डोळे झरू लागतात. पण कांद्यातून बाहेर पडणारं बाष्पयुक्त गंधक ओंकारच्या स्मार्ट चाकूवर लावलेल्या हायस्पीड ड्रोन मोटरच्या फॅनच्या मदतीनं विरुद्ध दिशेला ढकललं जातं. त्यामुळे गंधकयुक्त द्रव आणि डोळ्याचा संपर्क होत नाही. त्यामुळे डोळ्यांमध्ये पाणी येत नाही.

विशेष म्हणजे १६० रुपयांच्या साहित्यातून ओंकारनं हा चाकू तयार केला आहे. एक हायस्पीड ड्रोन मोटार, छोटा फॅन, एक इंच प्लॅस्टिक पाईप, वायर, प्रेस बटन , युएसबी सॉकेट , ३.७ व्होल्ट रिचार्जेबल बॅटरी, एलईडी लाईट. या पाइपच्या मुठीवर वेगवेगळ्या प्रकारचे चाकू बसवता येतात. कांदा कापताना घरातील वीज अचानक गेली तर बोटे कापू शकतात. हा प्रसंग ओढवू नये म्हणून अचानक वीज गेल्यास ऑटोमॅटिकली या स्मार्ट चाकूवरील एलईडी सुरू होऊन कांदा कापता येतो. चार्जिंग युनिट आणि चाकू वेगळा करता येतो. त्यामुळे चाकू धुता येतो. त्याची घडीसुध्दा करता येते.त्यामुळे तो कुठेही नेता येतो. मोबाईलच्या चार्जरने तसाच छोट्या सोलर प्लेटने तो चार्ज करता येतो. चार्जिंग पूर्ण झाल्याची सूचना देण्यासाठी इंडिकेटर. एकदा चार्ज केल्यानंतर या चाकूने पाच ते सात किलो कांदे सहज कापता येतात.

First published:
top videos

    Tags: Beed news, Inspiring story, Mother, Positive story