जाहिरात
मराठी बातम्या / Viral / मुलीच्या जन्माच्या तब्बल 53 वर्षींनी नसीरुद्दीन शाहांना हवाय जन्मदाखला; पण त्यात आहे 'ही' अडचण

मुलीच्या जन्माच्या तब्बल 53 वर्षींनी नसीरुद्दीन शाहांना हवाय जन्मदाखला; पण त्यात आहे 'ही' अडचण

नासिरुद्दीन शाह आणि मुलगी हिबा

नासिरुद्दीन शाह आणि मुलगी हिबा

बॉलिवूडमधले प्रसिद्ध आणि ज्येष्ठ कलाकार नसीरुद्दीन शाह यांची मोठी मुलगी हिबा हिचा जन्मदाखला त्यांना हवा आहे; मात्र हा दाखला मिळण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 24 जुलै : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह अनेक वेळा माध्यमांमध्ये चर्चेत असतात. त्यांची भूमिका, वादग्रस्त वक्तव्यं यावरून सोशल मीडियावरही त्यांची चर्चा होते. आता आणखी एका गोष्टीवरून ते चर्चेत आलेत. निमित्त आहे त्यांच्या मुलीच्या जन्मदाखल्याचं. मुलीच्या जन्माला 53 वर्षं झाल्यानंतर आता मुलीचा जन्मदाखला त्यांना हवा आहे; मात्र तो मिळण्यात अनेक अडचणी त्यांच्यासमोर आहेत. काही कायदेशीर बाबींचाही त्यात समावेश आहे. बॉलिवूडमधले प्रसिद्ध आणि ज्येष्ठ कलाकार नसीरुद्दीन शाह यांची मोठी मुलगी हिबा हिचा जन्मदाखला त्यांना हवा आहे; मात्र हा दाखला मिळण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. काहीच दिवसांपूर्वी हा दाखला मिळावा म्हणून अर्ज देण्यात आला होता. त्या वेळी संबंधित कागदपत्रांच्या अभावी हा दाखला देण्यास नकार देण्यात आला होता. आता हा दाखला मिळण्यासाठी आणखी एक अडचण निर्माण झालीय. नसीरुद्दीन शाह यांची मोठी मुलगी हिबा यांच्या जन्मदाखल्यासाठी नातेवाईक गौसिया शाह यांनी अलीगढ महानगरपालिकेत अर्ज दिला आहे. तो तपासणीसाठी सेनेटरी निरीक्षकांना पाठवण्यात आलाय. ज्या नर्सिंग होममध्ये त्यांचा जन्म झाला, त्याचे तपशील आरोग्य विभागाकडून मागवण्यात येणार आहेत; मात्र ते नर्सिंग होम आता बंद झालं आहे. त्यामुळे आता नसीरुद्दीन शाह यांची मुलगी हिबा हिचा जन्मदाखला मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झालाय. हा अर्ज तपासणीसाठी सेनेटरी निरीक्षकांकडे देण्यात आला असल्याचं अलीगढ महानगरपालिकेचे झोन प्रभारी विनय राय यांनी सांगितलं आहे. त्यात कागदपत्रं, अर्जदार, साक्षीदाराचं प्रतिज्ञापत्र आणि इतर सर्व तपशील तपासले जातील. अहवालाच्या आधारे हा अर्ज न्यायदंडाधिकाऱ्यांसमोरही पाठवला जाणार आहे. त्यानंतर दंडाधिकारी त्यांच्या स्तरावर सेनेटरी निरीक्षकांच्या अहवालाची पडताळणी करतील. त्यानंतरच हे प्रमाणपत्र दिलं जाऊ शकतं. जन्मदाखल्यासाठी केलेल्या अर्जानुसार, हिबा यांचा जन्म अलीगढ इथल्या टीकाराम नर्सिंग होममध्ये 20 ऑगस्ट 1970 रोजी झाल्याचा उल्लेख आहे; मात्र हे नर्सिंग होम गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. आता महापालिका सीएमओ कार्यालयाशी पत्रव्यवहार करणार आहे. 53 वर्षांनंतर हे प्रमाणपत्र मागवण्यात आल्यानं त्या नर्सिंग होमचं अस्तित्व आणि त्याच्या नोंदी याबाबत माहिती गोळा केली जाईल. त्यानंतर नियमानुसार जन्मदाखला मिळण्याबाबतची ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. हिबा शाह या नसीरुद्दीन शाह यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत. त्यांनी काही चित्रपट, तसंच मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यापैकी ‘बालिका वधू’ या मालिकेतल्या त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली होती.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात