जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - बापरे! हे काय आहे? आकाशात दिसला रहस्यमयी आगीचा गोळा; पाहून चक्रावले लोक

VIDEO - बापरे! हे काय आहे? आकाशात दिसला रहस्यमयी आगीचा गोळा; पाहून चक्रावले लोक

VIDEO - बापरे! हे काय आहे? आकाशात दिसला रहस्यमयी आगीचा गोळा; पाहून चक्रावले लोक

Mysterious burning fireball in sky : आकाशातील आगीचा हा गोळा नेमका कसला आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 02 एप्रिल : आकाशातून वीज कोसळताना तुम्ही पाहिलं असेल.  पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. आकाशात रहस्यमयी आगीचा गोळा दिसला आहे. तो पाहून लोक चक्रावले आहे. रात्री आकाशात अद्भुत असं दृश्य दिसलं. पण हे दृश्य पाहून धडकीही भरली. काळ्याकुट्ट आकाशातून एक प्रकाश जाताना दिसला. हा रहस्यमयी आगीचा गोळा असल्याचं दिसलं. आकाशातील आगीचा हा गोळा नेमका कसला आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे (Mysterious burning fireball in sky). पृथ्वीवर एखादा उल्कापिंड आदळणार असं बऱ्याचदा सांगितलं जातं. त्यामुळे आकाशात हा आगीचा हा गोळा पाहिल्यानंतर तो उल्कापिंड तर नाही ना, अशी भीती सर्वांना वाटते आहे. तशीच शक्यता वर्तवली जाते आहे. ही घटना परदेशातील नव्हे तर भारतातीलच आहे. पण त्याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. कुणी हे मध्य प्रदेश, कुणी गुजरात तर कुणी महाराष्ट्रातील असल्याचं म्हणतं आहे. पण नेमका हा व्हिडीओ कुठला आहे, हे स्पष्ट झालेलं नाही.

जाहिरात

दरम्यान एएनआय वृत्तसंस्थेच्या ट्विटनुसार महाराष्ट्रातील नागपूरसह राज्यातील इतर भागात हे अद्भुत दृश्य दिसल्याची माहिती देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं, “कृत्रिम उपग्रहावरील नियंत्रण सुटल्यामुळे तो पृथ्वीच्या गुरुत्त्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे खेचला गेला असावा आणि त्याचे तुकडे पृथ्वीच्या वातावरणात शिरताना घर्षणामुळे जळून जाताना आपल्याला ते दृश्य दिसलं असावं” तर मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील 300 वर्षे जुन्या जिवाजी वेधशाळेचे अधीक्षक राजेंद्र गुप्ता म्हणाले, “हा उल्कापिंडच वाटतो आहे. असे उल्का कोसळणं सामान्य आहे” हे वाचा -  वास्तुशास्त्रानुसार या 3 गोष्टींमध्ये करा थोडासा बदल; नशीब पालटायला वेळ नाही लागणार उल्का म्हणजे काय? आकाशात अनेक खगोलीय वस्तू फिरत असतात. अशा वस्तू पृथ्वीच्या कक्षेत येतात, पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करताना त्यांचे घनअस्तित्व संपून जाते आणि त्या जळून जातात. काही मोजक्याच उल्का या पाषाणाच्या स्वरूपात पृथ्वीवर पडत असतात. त्यांचा आकार लहान किंवा मोठा असू शकतो. या उल्का पृथ्वीच्या वायुमंडलात जबरदस्त वेगाने प्रवेश करतात. छोट्या उल्का असल्याच त्यांचा वेग 30 ते 60 किमी प्रति सेकंद असतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात