चुरु, 26 मे : असं म्हणतात की जे कष्ट करतात ते कधीच अपयशी होत नाहीत. राजस्थानच्या चुरूजवळील रत्ननगरच्या मुकेशची ही अशीच कहाणी आहे.
रतननगर सारख्या छोटय़ाशा शहरातील मुकेश नावाच्या तरुणाला अगदी कमी वयात मिळालेल्या यशाची आसपासच्या शहरांमध्ये चर्चा आहे. 25 वर्षीय मुकेशचे एमके स्टुडिओ नावाने एक यूट्यूब चॅनलवर असून यावर तब्बल 10 लाख सबस्क्रायबर आहेत. यायुट्यूब चॅनेलच्या माध्यमामातून मुकेश महिन्याला लाखो रुपये कमावत असून त्याच्या आणि कुटुंबाच्या सर्व इच्छा पूर्ण करीत आहे.
रत्नानगरचे रहिवासी मुकेश सांगतो की, यशाचा हा मार्ग त्याच्यासाठी इतका सोपा नव्हता. लाखो रुपयांच्या कॅमेऱ्याने आज आपल्या यूट्यूब चॅनलसाठी व्हिडिओ शूट करणाऱ्या मुकेशकडे सुरुवातीच्या काळात स्मार्ट फोन देखील नव्हता. मुकेश त्याच्या मित्रांच्या फोनवरून व्हिडिओ शूट करायचा आणि त्याच्या फोनवरूनच व्हिडिओ पाहायचा. तर मित्रांच्याच लॅपटॉप आणि कम्प्युटरवर तो व्हिडिओ एडिट करायचा.
सुरुवातीला मिळाले अपयश :
मुकेश 2016 मध्ये YouTube वर स्वतःचे डान्सिंग व्हिडिओ अपलोड करत जोतं परंतु त्याच्या या कॉन्टेन्टला यश आले नाही. त्यानंतर मुकेशने मित्रांसोबत कॉमेडी व्हिडिओ देखील बनवले परंतु त्याला ही प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद लाभला नाही. यानंतर, आपल्या कुटुंबाच्या आणि आजूबाजूच्या मुलांच्या मदतीने त्याने एमके स्टुडिओ नावाचे चॅनल तयार केले आणि त्यावर नृत्य आणि हृदयाला स्पर्श करणारे काही व्हिडिओ पोस्ट करण्यास सुरुवात केली. हे चॅनल सुरू केल्यानंतर मुकेश यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. आज या चॅनेलवर मुकेशचे 10 लाख फॉलोअर्स आहेत.
1 हजार फॉलोअर्ससाठी लागले एक वर्ष :
मुकेशने सांगितले की, सुरुवातीला एक हजार फॉलोअर्सपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला एक वर्ष लागले. आज त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 10 लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. मुकेशचे आज यूट्यूबवर जवळपास 6 चॅनल आहेत. तो या चॅनेलवर विविध कॉन्टेन्ट अपलोड करतो. एमके स्टुडिओ चॅनेलवर हार्ट टचिंग आणि डान्सचा कॉन्टेन्ट शेअर केला जातो. एमके स्टुडिओ ऑफिशियल चॅनेलवर शॉर्ट व्हिडिओ अपलोड केले जातात. अशा प्रकारे इतर चॅनेलवरील कॉन्टेन्ट देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Mobile Phone, Smart phone, Social media, Social media viral, Viral, Viral news