मुंबई, 15 जून : पेट्रोल-डिझेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहेत
(Petrol and diesel price hike). अशात याला पर्याय म्हणून देशी जुगाडचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतो आहे
(Desi jugaad video viral). या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका तरुणाने एका सेकंदातच फ्रीमध्ये आपल्या बाईकच्या फ्यूअलची टाकी फूल केली आहे. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढलेल्या असताना फ्रीमध्ये फ्यूल कोण बरं देईल, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. त्यामुळे तुम्हालाही हा जुगाड पाहण्याची उत्सुकता नक्कीच असेल. व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. तुम्हाला हसू आवरणार नाही. पण तरुणाने जो जुगाड केला, त्याच्या टॅलेंटलाही तुम्ही दाद दिल्याशिवाय राहणार नाही.
व्हिडीओत पाहू शकता रस्त्यावर एक तरुण बाईक चालवताना दिसतो आहे. रस्ता, बाईकचा पुढील भाग आणि बाईक चालणावऱ्या तरुणाचा हात इतकंच या व्हिडीओत दिसतं. व्हिडीओ तुम्ही नीट पाहिला तर तरुणाच्या बाईकमधील पेट्रोल संपत असल्याचं दिसतं आहे. त्याच्या बाईकचा फ्यूअल टँक रिकामा झाल्याचं इंडिकेटरवर दिसतं.
हे वाचा - अरे हे काय? छोट्याशा कारमध्ये एवढा मोठा सोफा ठेवायला निघाले लोक, परिणाम काय झाला तुम्हीच बघा, VIDEO
आता सामान्यपणे असं झालं तर कुणीही पेट्रोलपंपकडे वळेल. पण हा तरुण बाईक चालवतच राहतो. पेट्रोलपंपवर न जाता तो बाईक चालवता चालवताच फ्रीमध्ये आपल्या बाईकचा फ्लूअल टँक फूल करण्याची एक जबरदस्त आयडिया काढतो.
तो बाईकच्या इंडिकेटरवरील ग्लास काढतो. त्यानंतर फ्लूअल कमी असल्याचा दाखवणारा काटा तो आपल्या बोटानेच फिरवतो आणि फूलवर नेतो. त्यानंतर इंडिकेटरवरील ग्लास पुन्हा लावतो. काय मग एम्प्टी फ्लूअल टँक काही क्षणातच फ्रीमध्ये फूल झाला की नाही.
हे वाचा - बापरे! या विचित्र जीवाला पाहून सर्वांना फुटला घाम; हा कोण आहे तुम्हाला माहितीये का?
@memecentral.teb हा मजेशीर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. टँक भरण्याचा हा एकमेव मार्ग आहे, असं कॅप्शनही या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हा जुगाड व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.