मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चिमुकल्या लेकीच्या खतरनाक हौशेमुळे आई दहशतीत; तिची खेळणी पाहूनही फुटतो घाम

चिमुकल्या लेकीच्या खतरनाक हौशेमुळे आई दहशतीत; तिची खेळणी पाहूनही फुटतो घाम

6 वर्षांच्या मुलीने असं खेळणं खरेदी केलं जे पाहून तिच्या आईलाही धक्का बसला.

6 वर्षांच्या मुलीने असं खेळणं खरेदी केलं जे पाहून तिच्या आईलाही धक्का बसला.

6 वर्षांच्या मुलीने असं खेळणं खरेदी केलं जे पाहून तिच्या आईलाही धक्का बसला.

    लंडन, 22 ऑक्टोबर : लहान मुलं (Children) म्हणजे खेळणं (Toys) आलंच. मुलं बऱ्याच वेळा आपल्या आवडीच्या खेळण्यांसाठी हट्ट करतात. लहान म्हणून आई-वडीलही मुलांचा खेळण्यांचा हट्ट पूर्ण करतात. पण एका चिमुकलीला अशी खेळणी आवडतात (Horrible toy), जी पाहून तिच्या आईलाही (Mother) घाम फुटतो. अवघ्या 6 वर्षांच्या लेकीला (Daughter) अशी खतरनाक हौस आहे की त्यामुळे तिची आईही दहशतीत आहे. 6 वर्षांची स्काईने आपल्यासाठी एक खेळणं खरेदी केलं (6 year lod girl's Horrible toy). घरी जाण्यापूर्वी तिने आपली आई जोडी लूला व्हिडीओ कॉल करून आपलं खेळणं दाखवलं. तिचं खेळणं पाहून तिच्या आईला धक्काच बसला. कारण स्काईने खरेदी केलंलं खेळणं म्हणजे एक भयंकर अशी बाहुली होती. जी एखाद्या हाडांच्या सापळ्यासारखी दिसत होती. तिला डोळे नव्हते तर डोळ्यात छेद होता आणि त्यातून लाल लाइट पेटत होती. एका घोड्यावर बसलेली ही बाहुली. बटण दाबताच घोड्यासोबत ती बाहुली हलू लागते आणि खतरनाक अशा आवाजात गाते. एखाद्या हॉरर फिल्ममध्ये दिसावी तशीच ही बाहुली. हे वाचा - बापरे! हे काय? चिमुकल्या लेकाच्या हाती लागलं असं खेळणं; पाहून वडिलही हादरले झी न्यूजने मिरर यूकेच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार जोडी लूने सांगितलं, स्काईने हॅलोवीनसाठी शॉपिंग केली. घरी येण्याआधी तिने व्हिडीओ कॉल करून खरेदी केलेलं खेळणं दाखवलं, तेव्हा मला धक्काच बसला. मी तिला हे खेळणं घरी आणू नको म्हणून सांगितलं कारण ते खूपच भयानक होतं. एखाद्या हॉरर फिल्ममधील कॅरेक्टरसारखं होतं. पण तरी स्काई ते घरी घेऊन आली. स्काईला आपल्या इतर भावंडांपेक्षा निर्भीड आणि हिंमतवाली आहे. तिच्या या स्वभावाबाबत मलाही आश्चर्य वाटतं. आता या खेळण्याने ती आपली 9 वर्षांची बहीण लेक्सी आणि 3 वर्षांचा भाऊ रूला  घाबरवते  आणि त्यांच्याकडून स्वतःचं काम करून घेते, असं ती म्हणाली. हे वाचा - चिमुकली लेक खेळत होती असा खेळ; पाहून वडीलांना दरदरून फुटला घाम 31 ऑक्टोबरला हॅलोवीनलाही ती भुतासारखी तयार होण्याचा विचार करते आहे. आता ती कोणती भयानक वस्तू घरी आणणार आहे आता याचीच चिंता जोडीला लागली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Viral, Viral news

    पुढील बातम्या