नवी दिल्ली, 24 जानेवारी : संपूर्ण जगात आईपेक्षा जास्त प्रेम आपल्यावर कोणीच करु शकत नाही, असं म्हटलं जातं. निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती कोणी असेल ती आई असते. कोणत्याही अपेक्षेशिवाय आणि स्वार्थशिवाय ती आपली काळजी घेत असते. त्यामुळे तिला देवाच्या जागी मानलं जातं. सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडीओंमधून आईचं आपल्या बाळावरचं प्रेम दिसून येतं. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून यामध्ये आई आपल्या बाळाला वाचवण्यासाठी स्वःताचा जीव धोक्यात घालते.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक महिला आपल्या बाळाला घेऊन रस्त्याच्या कडेने चालत आहे. तेवढ्यात समोरु एक गाडी येऊ लागते. ती गाडी त्यांच्यावर अंगावर येताचा दिसतेय. आपल्या बाळाला काही होऊ नये म्हणून ती महिला बाळाला बाजूला सारून गाडीसमोर येते. गाडी तिला धडक मारुन निघून जाते. महिला मात्र पुन्हा उठून आपल्या बाळाला तर काही झालं नाही ना हे पाहते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.
Mom tries to shield the baby from the impact... then another vehicle stops that car from getting away. pic.twitter.com/PAqmg1n3P8
— Dr. Ajayita (@DoctorAjayita) January 22, 2023
पुढे ती गाडी निघून जात असल्यामुळे समोरुन येणारी गाडी त्या गाडीला अडवत असल्याचंही या व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे. आपल्या मुलासाठी आई काहीही करुन शकते हे पुन्हा या व्हिडीओवरुन पहायला मिळत आहे. व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून लोक व्हिडीओवर भरभरुन प्रतिक्रिया देत आहेत.
दरम्यान, @DoctorAjayita या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. महिलेच्या साहसाचं लोक कमेंट करत कौतुक करत आहेत. अवघ्या 24 सेकंदांचा हा व्हिडिओ 5 लाख 91 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 5 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media, Social media viral, Top trending, Twitter, Viral, Viral news, Viral video.