मुंबई, 02 ऑगस्ट : आई आपल्या लेकरांसाठी काहीही करू शकते, कितीही मोठ्या संकटाला सामोरं जाऊ शकते. आईची माया, प्रेम हे फक्त माणसंच नव्हे तर प्राण्यांमध्येही दिसून येतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका हत्तीणीने आपल्या पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी खतरनाक मगरीशीही झुंज दिली आहे. मगरीच्या जबड्यातून तिने आपल्या पिल्लाला बाहेर काढलं आहे.
जसा जंगलाचा राजा सिंह तसं पाण्यात मगरीचं राज्य असतं. मगर अगदी शांतपणे, हुशारीने, संधी साधून शिकार करते. बऱ्यादा सावजालाही आपण शिकार होणार आहोत हे माहिती नसतं. मगर समोर कोणता प्राणी आहे, किती मोठा आहे आणि तो किती खतरनाक आहे हे पाहत नाही. ती थेट त्याच्यावर हल्ला करते. अगदी अवाढव्य हत्तींनाही ती सोडत नाही. अशाच हत्तीवर हल्ला करणं मगरीला भारी पडलं आहे. शेवटी तिला तिचाच जीव वाचवण्यासाठी धडपड करावी लागली. कारण मगरीने मोठ्या हत्तीवर नव्हे तर हत्तीच्या पिल्लावर हल्ला केला होता.
हे वाचा - चोचीने घायाळ केलं तरी एकट्या उंदराने दोन-दोन कोंबड्यांशी दिली झुंज; जरूर पाहा VIDEO चा शेवट
व्हिडीओत पाहू शकता, हत्तींचा कळप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतं. मध्येच एक दलदल लागते. ही दलदल ते पार करत असतात. पण याच दलदलीत खतरनाक मगर शिकारीसाठी दबा धरून बसली होती. जसे हत्ती त्या दलदलीतून जातात तशी मगर बाहेर येत हत्तींवर हल्ला करते. सर्व हत्ती भितीने पळू लागतात. पण एक पिल्लू मात्र मगरीच्या तावडीत सापडतं.
Mother elephant rescues baby elephant from the jaws of a crocodile. Elephants are Just Incredible 🐘
Credits - in the Video pic.twitter.com/Hf20e5WKau — Supriya Sahu IAS (@supriyasahuias) July 30, 2022
मगर हत्तीच्या पिल्लाची सोंड आपल्या जबड्यात धरतं. पिल्लू आपली सोंड मगरीच्या जबड्यातून सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करतं. पण मगरीने ते इतकं घट्ट पकडलं आहे की त्याला ती सोडवता येत नाही. अखेर पिल्लाची आई तिथं धावत येते. पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी ती मगरीशी भिडते. मगरीच्या पाठीवर उभी राहते आणि मगरीला पायाने तुडवताना दिसते. हत्तीच्या पिल्लावर हल्ला करणारी मगर आता स्वतःचा जीव हत्तीपासून वाचवण्यासाठी धडपडते. हत्तीने मगरीवर हल्ला करतातच पिल्लाच्या सोंडेवरील तिची पकड सुटते आणि पिल्लाची सुटका होते.
हे वाचा - WOW! कबुतराचं कधीच पाहिलं नसेल असं रूप; अद्भुत टॅलेंट पाहून थक्क व्हाल; Watch Video
आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Elephant, Viral, Viral videos, Wild animal