मुंबई 04 ऑक्टोबर : हल्ली वाढदिवस, अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा ट्रेंड वाढलाय. जंगी पार्टीचं आयोजन करून, छान सजावट आणि जेवणाचे विविध पदार्थ पार्टीतल्या सगळ्यांसाठी केले जातात. मुलांचे वाढदिवस असतील तर त्यानुसार म्युझिक, डान्स, फोटोसेशन आणि भरपूर जेवण अशी एकंदरीत पार्टीची थीम असते. नातेवाईक आणि मित्रांना आमंत्रण दिलं जातं आणि पार्टी एंजॉय केली जाते. अशाच एका वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मुलांना अॅसिड प्यायला दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाकिस्तानमधील लाहोरमधून ही घटना समोर आली आहे. या मुलांना पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत अॅसिड देण्यात आलं. त्या अॅसिडमुळे दोन मुलांची तब्येत खराब झाली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दोघांपैकी एकाने हे पाणी प्यायलं होतं तर एकाने या पाण्याने हात धुतले होते. त्यानंतर दोघांचीही तब्येत बिघडली. या घटनेची तक्रार लारी अड्डा पोलीस स्थानकात देण्यात आली आहे. हे वाचा : बिअर पिऊन मुलांना शिकवत होता शिक्षक, Viral Video पाहून लोकांकडून संताप व्यक्त तक्रारदार मोहम्मद आदिल यांनी पोलिसांना सांगितलं की, " 27 सप्टेंबर रोजी वाढदिवसाच्या पार्टीसाठी कुटुंबासह पोएटमट रेस्टॉरंध्ये गेले होते. तिथे बसल्यानंतर रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी पिण्यासाठी पाण्याची बाटली ठेवली. माझ्या भाच्याने हात धुण्यासाठी बाटलीतून पाणी हातावर टाकताच तो जोरजोरात ओरडू लागला, त्याच्या हाताला जळजळ होत होती." नंतर या बाटल्यांमध्ये पाणी नसून अॅसिड असल्याची माहिती त्यांनी लगेच रेस्टॉरंटच्या मॅनेजरला दिली गेली. हे वाचा : ऑनलाइन क्लासमध्येच 59 वर्षाच्या शिक्षकाचं किळसवाणं कृत्य, पॉर्न साईट पाहून… त्यानंतर त्यांच्या अडीच वर्षांच्या भाचीलाही उलट्या होऊ लागल्या. कारण तिने दुसऱ्या बाटलीतून ते पाणी प्यायलं होतं आणि त्यातही अॅसिड होतं. दोन्ही मुलांना घेऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. दोन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पीडित मुलांच्या कुटुंबीयांनी स्थानिक पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली. नंतर पोलिसांनी रेस्टॉरंटच्या मॅनेजरसह 5 जणांविरुद्ध पाकिस्तान पीनल कोड 336B अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी रेस्टॉरंट मॅनेजर मोहम्मद जावेदसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात येत आहे. तसंच तपास पूर्ण होईपर्यंत रेस्टॉरंट बंद ठेवण्यात येणार आहे. रेस्टॉरंटमध्ये पिण्यासाठी पाण्याऐवजी अॅसिड प्यायला देणं ही खूप गंभीर बाब आहे, याचा पोलीस सविस्तर तपास करत आहेत,अशी माहिती पोलीस अधिकारी ताहीर वकास यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.