मुंबई, 28 मार्च : हल्ली प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. काही जण तर एकाच वेळी दोन किंवा त्यापेक्षा अधिक सिमकार्ड वापरतात. काही जण सतत आपला मोबाईल नंबर बदलत असतात. एखाद्या कंपनीचा मोबाईल नंबर वापरल्यानंतर त्याचे प्लॅन महागडे असणं, नेटवर्क प्रॉब्लेम येणं अशी समस्या सामान्यपणे असते. पण कधी कोणता मोबाईल नंबर कुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला असं तुम्ही ऐकलं तरी आहे का? तुम्हाला वाचून धक्का बसेल असा एक मोबाईल नंबर आहे, जो ज्याने ज्याने वापरला त्याचा मृत्यू झाला आहे (Haunted Mobile Number)
हंटेड म्हणजे झपाटलेली घरं, ठिकाणांबाबत तुम्ही ऐकलं असेल. जिथं काही विचित्र घडतं किंवा दिसतं. जिथं जाताच लोक गायब होतात किंवा त्यांचा मृत्यू होतो. एखादी डॉल किंवा एखादा माणूस ज्याच्यामध्ये एखादी आत्मा असतो याबाबतही तुम्ही बऱ्याच स्टोरी ऐकल्या असतील. पण एखादा मोबाईल नंबरही हंटेड असू शकतो याबाबत कधी ऐकलं आहे. असा मोबाईल नंबर आहे. हा मोबाईल नंबर ज्यांनी घेतला त्यांनी अप्रत्यक्षपणे मृत्यूला आमंत्रण दिलं.
हे वाचा - सहजच Google वर सर्च केलं आईचं नाव; समोर आलेलं सत्य जाणून हादरला तरुण
2000 ते 2005 साली या नंबरमुळे 3 लोकांचा मृत्यू झाला. या नंबरचा पहिल्यांदा वापर करणारी व्यक्ती व्लादिमीर ग्राशनोव (Vladimir Grashnov). तो बल्गेरियातील मोबिटेल (Bulgarian Mobitel) नावाच्या कंपनीचा सीईओ होता. हा मोबाईल नंबर वापरल्यानंतर वर्षभरातच वयाच्या 48 व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू कॅन्सरमुळे झाल्याचं सांगण्यात आलं. पण त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनी त्याला रेडिओअॅक्टिव्ह विष दिल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. या नंबर वापर करणारी दुसरी व्यक्ती दिमेत्रोव. तो एक माफिया डिलर होता. हा फोन नंबर घेतल्यानंतर काही कालावधीतच त्याची हत्या झाली. त्यानंतर 2005 साली बुल्गेरियातील एका व्यापाऱ्याने हा नंबर घेतला आणि त्याचीही हत्या झाली. त्याच्यावर कोकिन तस्करीचा आरोप होता.
हे वाचा - दुचाकी खरेदी करण्यासाठी 1 रुपयाची 2.6 लाख नाणी घेऊन शोरूममध्ये पोहोचला तरुण, पुढे काय घडलं वाचा
आता ज्या नंबरने या लोकांचा जीव घेतला तो नंबर कोणता हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेलच. हा नंबर होता 0888888888. नंबर थोडा वेगळा असल्याने VIP वाटत होता म्हणूनच कदाचित लोक हा नंबर अलॉट करत होते.हा फोन नंबर बुल्गारियातील आहे. या नंबरवर कंपनीकडून कोणत्याच प्रकारची प्रतिक्रिया आली नाही. तीन मृत्यूनंतर हा नंबर सस्पेंड करण्यात आला. सलग अशा तीन घटना घडल्यानंतर या नंबरला हंडेट, अशुभ नंबर मानण्यात आलं. सोशल मीडियावर या नंबरची खूप चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Mobile, Mobile Phone, Viral, Viral news