नवी दिल्ली, 20 जानेवारी : आजकाल प्रत्येक गोष्टीची किंमत वाढत चालल्याचं पहायला मिळत आहे. अनेक गोष्टींचा आपण विचारही करुन शकत नाही असे पैसे आकारले जातात. यामुळे सर्वसामान्यांना त्याचा फटका बसत असतो. लोक आपल्या खाण्यावर आणि शॉपिंगवर सहसा सर्वात जास्त पैसा खर्च करतात. यासाठीही भरपूर पैसे खर्च केले जातात. अशाच एका महाग खाद्यपदार्थाविषयी आज तुम्हाला सांगणार आहोत. ज्याचा तुम्ही कधीही विचार केला नसेल की याची किंमतही एवढी असू शकते.
लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेकांना खाण्याची फार आवड असते. विविध पदार्थ ते ट्राय करत असतात. यातील एक आवडता पदार्थ म्हणजे सॅंडवीच. यामध्ये अनेक प्रकारची सॅंडवीच मिळत असल्यामुळे लोक आवडीने याचा आस्वाद घेतात. साधारणपणे, रस्त्याच्या कडेला मिळणाऱ्या सँडविचची किंमत इतकी कमी असते की सामान्य लोकही ते सहज खाऊ शकतात. दुसरीकडे, मोठ्या रेस्टॉरंट्समध्ये उपलब्ध असलेले सँडविच थोडे महाग असतात. पण अमेरिकेतील एका शहरात एक सँडविच सापडले आहे जे इतके महाग आहे की सामान्य माणूस ते विकत घेण्याचा विचारही करू शकत नाही.
हे सर्वात महागडं सॅंडवीच न्यूयॉर्कमध्ये मिळत असल्याचं समोर आलं आहे. ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटनुसार, न्यूयॉर्कमधील सेरेंडिपीटी 3 या रेस्टॉरंटमध्ये हे सर्वात महागडं सॅंजवीच मिळत आहे. याची नोंद चक्क गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली आहे. आश्चर्यांची गोष्ट म्हणजे या रेस्टाॉरंटमध्ये महागडे डेजर्ट, हॅम्बर्गर, वेडिंग केकचाही रेकॉर्ड आहे.
या महागड्या सॅंडवीचची किंमत चक्क 17 हजार रुपये असून या महागड्या सॅंडवीचचं नाव क्विंटेसेंशिअल ग्रिल सॅंडवीच आहे. या सॅंडवीचमध्ये घातले जाणाऱ्या वस्तू खूपच महाग आणि दुर्मिळ असतात. या सॅंडवीचमध्ये फेंच ब्रेडचे दोन तुकडे वापरले जातात. जे डोम पेरिग्नॉन शॅम्पियन आणि खाण्यायोग्य सोन्याच्या फ्लेक्ससह बनवलेले असतात. यामध्ये पांढरे ट्रफल बटर पसरवले जातात आणि सोबतच ब्रेड कोसिओकाव्हलो पोडोलिको चीज पसरवले जाते. या महाग वस्तूंचा वापर या सॅंडवीच बनवण्यासाठी केला जातो. सोबतच याला दक्षिण आफ्रिकन लॉबस्टर टोमॅटो बिस्क डिपिंग सॉससह बॅकरॅट क्रिस्टल प्लेटवर दिले जाते.
दरम्यान, या गोष्टी किती दुर्मिळ आहेत हे तुम्हाला या नावावरूनच कळले असेल. हेच कारण आहे की जर तुम्हाला हे सँडविच खावेसे वाटत असेल तर तुम्हाला ते 48 तास अगोदर म्हणजेच 2 दिवस अगोदर ऑर्डर करावे लागेल. कोणी सँडविच खाण्यासाठी ऑर्डर दिली तरच वेगवेगळ्या ठिकाणाहून माल मागवला जातो. यामध्ये वापरले जाणारे चीज खास इटलीहून आणले असून ते खास प्रजातीच्या गायींच्या दुधापासून बनवले जाते. ही गाय वर्षातून केवळ 2 महिने दूध देते आणि त्यांच्या दुधासाठी केवळ 25 हजार गायींचे पालनपोषण केले जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Tasty food, Top trending, Video viral, Viral news, World record