जाहिरात
मराठी बातम्या / Viral / जगातला सगळ्यात सुंदर डास! चावला तरी मारायची इच्छा होणार नाही

जगातला सगळ्यात सुंदर डास! चावला तरी मारायची इच्छा होणार नाही

जगातला सगळ्यात सुंदर डास! चावला तरी मारायची इच्छा होणार नाही

जगात डासांची एक प्रजाती अशीही आहे, जी खरंच खूप सुंदर आहे. सेबेथस साएन्युअस (Sabethes Cynaeus) नावाच्या या प्रजातीचे डास एवढे आकर्षक असतात, की ते चावत असताना (Attractive mosquito) त्यांना मारण्याचाही विचार तुम्ही करणार नाही.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 3 सप्टेंबर : मच्छर किंवा डास म्हटलं की छोटा, गुणगुण करुन त्रास देणारा आणि अतिशय वाईट असा कीटक आपल्या (Mosquito) डोळ्यासमोर येतो. पण याच डासाला कोणी सुंदर (Beautiful mosquito) म्हटलं तर? विश्वास नाही बसणार ना? मात्र हे खरंय. जगात डासांची एक प्रजाती अशीही आहे, जी खरंच खूप सुंदर आहे. सेबेथस साएन्युअस (Sabethes Cynaeus) नावाच्या या प्रजातीचे डास एवढे आकर्षक असतात, की ते चावत असताना (Attractive mosquito) त्यांना मारण्याचाही विचार तुम्ही करणार नाही. या प्रजातीचे डास दक्षिण अमेरिकेच्या उष्ण पट्ट्यातील जंगलात आढळतात. गडद निळ्या रंगांच्या (Blue Mosquito) या डासांचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांच्या पायांना चक्क मऊ पिसं (Feathers) असतात. सामान्यपणे काळ्या किंवा करड्या रंगाचे डास पाहण्याची आपल्याला सवय असते. त्यामुळेच हा निळ्या रंगाचा (Most beautiful mosquito) डास सर्वांचंच लक्ष वेधून घेतो. मात्र, असं असलं तरी याच्या सौंदर्यावर भाळून जाण्याची चूक करु नका. या प्रजातीतील डासांच्या सवयीही इतर डासांप्रमाणेच आहेत. किंबहुना इतरांपेक्षा हे एक पाऊल पुढेच आहेत. बीबीसीचे वाईल्डलाईफ फोटोग्राफर गिल व्हिजन (BBC mosquito photos) सांगतात, की या प्रजातीचे डास अतिशय चपळ (Blue mosquito) असतात. या डासांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अगदी स्थिर रहावं लागतं. तसेच, फ्लॅश पडताच हे डास क्षणार्धात उडून जातात. मग तिथे अगदी दहा-बारा डास तुमच्या डोक्यावर घोंघावत असतील, तरीही त्यांचा फोटो काढणं अवघड काम आहे. हा फोटो जरी केवळ एका डासाचा असला, तरी त्यामागे प्रचंड मेहनत दडलेली आहे. सेबेथस साएन्युअस प्रजातीचे डासही इतर डासांप्रमाणेच घातक असतात. दिसायला ते जेवढे मनमोहक आहेत, तेवढेच ते वाईटही आहेत. या डासांमार्फत यलो फीव्हर (Yellow fever), डेंग्यू यांसारखे जीवघेणे आजार पसरू शकतात. अर्थात, सध्या तरी हे डास केवळ अमेरिकेच्या जंगलांमध्येच आढळून येतात. त्यामुळे आपल्याला तरी त्यांचा धोका नाही. जगभरात आतापर्यंत डासांच्या 3,300 प्रजातींचा शोध लागला आहे. संशोधनामध्ये असंही समोर आलं आहे, की डासांच्या बहुतांश प्रजातींमध्ये केवळ मादी डासच रक्त पितात. त्यातही काही मादी डास केवळ अंडी देण्यापूर्वीच रक्त पितात. डासांमार्फत डेंग्यू, मलेरिया (Diseases caused by mosquitos) अशा घातक आजारांचा प्रसार होतो. त्यामुळे डासांपासून खबरदारी बाळगणे गरजेचे असते. यासाठी एका ठिकाणी पाणी साचू न देणे, पिण्याच्या पाण्याची भांडी आणि टाक्या वेळोवेळी स्वच्छ करणे, आणि परिसरामध्ये वेळोवेळी पेस्ट कंट्रोल करुन घेणे असे काही उपाय करणे आवश्यक असते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात