मराठी बातम्या /बातम्या /Viral /

12 पेक्षा अधिक वाघांवरही भारी पडलं एक छोटंसं बदक; कशी उडाली दमछाक पाहा VIDEO

12 पेक्षा अधिक वाघांवरही भारी पडलं एक छोटंसं बदक; कशी उडाली दमछाक पाहा VIDEO

12 पेक्षा अधिक वाघ एकत्र मिळूनही एकट्या बदकाची शिकार करू शकले नाही.

12 पेक्षा अधिक वाघ एकत्र मिळूनही एकट्या बदकाची शिकार करू शकले नाही.

12 पेक्षा अधिक वाघ एकत्र मिळूनही एकट्या बदकाची शिकार करू शकले नाही.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 17 फेब्रुवारी : वाघ म्हटलं की भलेभले प्राणीही त्याच्यापासून दूर पळतात. वाघ अगदी हुशारीने शिकारीवर डाव साधतो. एकदा का त्याच्या जबड्यात कुणी सापडलं तर त्याची सुटका अशक्यच. पण सध्या सोशल मीडियावर वाघाचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून तुम्हाला धक्काच बसेल (Tiger Duck video). एक छोटंसं बदक बारापेक्षा अधिक वाघांना भारी पडलं आहे (Tiger attack on duck video).

म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. त्याचाच प्रत्यय या व्हिडीओतून होतो. वाघ किती ताकदवान आहे हे आपल्याला माहितीच आहे. अशाच 12 पेक्षा अधिक वाघांचा कळप असेल तर त्यांच्यासमोर शिकारीचा टिकाव लागणं शक्यच नाही. अशात हे बदक मात्र नशीबवान आहे. भले त्याच्याकडे वाघासारखी शक्ती नाही पण इतक्या भयंकर प्राण्याची शिकार होणार नाही, इतकी क्षमता मात्र त्याच्याकडे आहे. वाघांशी थेट टक्कर न देता तो युक्तीने त्यांचा सामना करतो.

हे वाचा - चक्क पक्षाने केली हरणाची शिकार; VIDEO पाहून बसणार नाही डोळ्यावर विश्वास

व्हिडीओत पाहू शकता, पाणवठ्याजवळ सुरुवातीला तीन वाघ दिसतात. इतक्यात वरून एक बदक त्या पाण्यात उडी मारतं. बदकाला पाण्यात पाहताच एक वाघ त्याची शिकार करण्यासाठी पाण्यात उडी मारतो. तो त्या बदकाला शोधतो पण त्याला काही बदक सापडत नाही. थोड्या वेळाने बदक त्यांना दिसतं, तसा आणखी एक वाघ पाण्यात उडी मारतो. दोघंही त्या बदकाला शोधतात पण बदक पाण्यात पुन्हा गायब होतं. आजूबाजूचे वाघही बदक कुठे दिसतं आहे का ते पाहतात.

" isDesktop="true" id="669995" >

सर्व वाघांनी या बदकाला पाण्यात घेरलं. पण तरी एकाही वाघाच्या तावडीत हे बदक सापडलं नाही. इतके वाघ मिळूनही या एकट्या बदकाची शिकार करू शकले नाही. त्यांची ताकद या छोट्याशा पक्ष्यासमोरही फेल ठरली. वाघ त्याच्यावर हल्ला करायला झेपावताच ते पाण्यात डुबकी मारतं आणि काही क्षणातच गायब होतं. जणू वाघांसोबत ते लपंडाव खेळत आपला जीव वाचवतं.

हे वाचा - आगीतून फुफाट्यात! मगरीच्या तावडीतून वाचलं पण बिबट्याच्या हाती लागलं हरीण, VIDEO

rupesh273 नावाच्या युट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. बदकाची हुशारी आणि हिंमत अशी आहे की त्याला दाद द्यायलाच हवी.

First published:

Tags: Tiger, Tiger attack, Tiger hunting video, Viral, Viral videos, Wild animal