मराठी बातम्या /बातम्या /Viral /पाणीपुरीप्रेमींचा पुन्हा संताप, तिखट पाण्याऐवजी घातला मिरिंडा; पाहा VIDEO

पाणीपुरीप्रेमींचा पुन्हा संताप, तिखट पाण्याऐवजी घातला मिरिंडा; पाहा VIDEO

पाणीपुरीत कुणी कोल्ड्रिंक घालतं का कधी? याचं उत्तर तुम्ही नाही असंच द्याल, मात्र एका बहाद्दरानं अशी पाणीपुरी विकायला सुरुवातही केलीय.

पाणीपुरीत कुणी कोल्ड्रिंक घालतं का कधी? याचं उत्तर तुम्ही नाही असंच द्याल, मात्र एका बहाद्दरानं अशी पाणीपुरी विकायला सुरुवातही केलीय.

पाणीपुरीत कुणी कोल्ड्रिंक घालतं का कधी? याचं उत्तर तुम्ही नाही असंच द्याल, मात्र एका बहाद्दरानं अशी पाणीपुरी विकायला सुरुवातही केलीय.

जयपूर, 19 डिसेंबर: एक विक्रेता पाणीपुरीमध्ये (Pani Puri Vender) तिखट पाण्याऐवजी मिरिंडा (Mirinda Cold Drink) घालून विकत असल्याचं पाहून खाद्यप्रेमींमध्ये (Food Lovers Angry) संतापाची लाट उसळली आहे. पाणीपुरी हे अनेकांचं आवडतं खाद्य (Favorite Food) असतं. त्याबाबतीत कुठलाही अगोचरपणा खाद्यप्रेमींकडून खपवून घेतला नाही. आपल्या आवडीच्या पदार्थाच्या मूळ स्वरुपाला धक्का लावण्याचा जर कुणी प्रयत्न केला, तर खाद्यप्रेमींचं पित्त खवळत असतं. गेल्या काही दिवसांपासून अशाच प्रकारे पित्त खवळायला लावणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. पाणीपुरीबाबतचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राजस्थानच्या जयपूरमधील ही घटना आहे. तिथं पाणीपुरीचा व्यवसाय करणारा एकजण पुरीत पाण्याऐवजी मिरिंडा वापरतो. त्याने स्वतःच हा व्हिडिओ रेकॉर्डे करून सोशल मीडियावर टाकला आहे. सामान्य पाणीसोबत हा प्रयोग पाहा, असा सल्लाही त्यानं दिला आहे. मात्र त्यामुळे पाणीपुरीप्रेमी चांगलेच संतापले आहे. आपल्या आवडत्या पदार्थासोबत जे काही केलं जात आहे, ते त्यांना बिलकूल सहन झालेलं नाही.

पाणीपुरीत घातला मिरिंडा

पाणीपुरीत हा विक्रेता पाण्याऐवजी चक्क मिरिंडा घालतो. एका फूड ब्लॉगरनं याचा व्हिडिओ तयार केला आहे. त्यात पाणीपुरी तयार करण्याचा हा प्रकार तो दाखवतो, पाणीपुरी खातो आणि ती चविष्ट असल्याचंही सांगतो. हे पाहिल्यावर पाणीपुरी प्रेमींमधून संतापाची लाट उमटणं स्वाभाविकच होतं. मिरिंडा पाणीपुरी जबरदस्त आहे, एकदम गोड आणि सेक्सी पाणीपुरी खाल्ल्याचा अनुभव आला, अशा भावना ब्लॉगरने व्यक्त केल्या. त्यानंतर पाणीपुरी प्रेमी खवळले आहेत.

हे वाचा - Tiger Woods पेक्षा जास्त फॉलोअर्स असणारी Gold Player, लूक पाहून भडकतात लोक

हेच पाहायचं राहिलं होतं

आयुष्यात फक्त हेच पाहणं बाकी होतं, अशी उद्वेगजनक प्रतिक्रिया एकाने दिली आहे. तर जर पुरीत मिरिंडाच घालून खायचा असेल, तर त्यासाठी गाड्यावर जाण्याची काय गरज आहे, असा सवाल दुसऱ्या एका युजरने उपस्थित केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 30 लाख लोकांनी पाहिला आहे. मात्र त्यापैकी बहुतांश जणांनी या प्रकाराला शिव्याच घातल्या असून तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

First published:
top videos

    Tags: Food, Pani, Viral video.