Home /News /viral /

कोट्यवधींची लॉटरीच बेतली जिवावर; पैसे मिळाले पण गावकऱ्यांना सोडावं लागलं गाव, काय आहे प्रकरण?

कोट्यवधींची लॉटरीच बेतली जिवावर; पैसे मिळाले पण गावकऱ्यांना सोडावं लागलं गाव, काय आहे प्रकरण?

नर्सरीमध्ये 24-25 विद्यार्थी (Students) आहेत. नर्सरीला विजयी घोषित केल्यानंतर लगेचच नर्सरीतल्या मुलांच्या पालकांना एका सशस्त्र गटाकडून धमक्या आल्या.

वॉशिंग्टन 24 नोव्हेंबर : अमेरिकेत मेक्सिकोच्या (Mexico) ग्रामीण भागात असलेली सामाजिक अराजकता तिथल्या नागरिकांच्या आयुष्याचा एक भाग झालेली आहे. तिथल्या ग्रामीण भागातले नागरिक कायम सशस्त्र टोळ्यांच्या दहशतीखाली वावरतात. काही दिवसांपासून दक्षिण मेक्सिकोमधल्या काही कुटुंबांना एका सशस्त्र टोळीकडून (Armed gang) धमक्या मिळत आहेत. त्यामुळे या कुटुंबांवर गाव सोडण्याची वेळ आली आहे. ओकोसिंगो गावातल्या काही पालकांचं म्हणणं आहे की, त्यांच्या मुलांच्या पाळणाघरानं (Nursery) लॉटरीमध्ये (Lottery) 20 दशलक्ष पेसो (9 लाख 50 हजार डॉलर्स म्हणजे 7 कोटी 7 लाख 53 हजार 672 भारतीय रुपये) जिंकल्यानंतर त्यांना टोळीकडून धमकावलं जात आहे. नर्सरीमध्ये 24-25 विद्यार्थी (Students) आहेत. नर्सरीला विजयी घोषित केल्यानंतर लगेचच नर्सरीतल्या मुलांच्या पालकांना एका सशस्त्र गटाकडून धमक्या आल्या. लॉटरीचे पैसे टोळीला शस्त्रं खरेदी करण्यासाठी द्यावेत, अशी त्यांची मागणी आहे. टोळीकडून धमक्या आल्यानंतर या कुटुंबांना गाव सोडावं लागलं आहे. सध्या ती कुटुंबं कठीण परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत. 'प्लेन लॉटरी'ची तिकिटं गरीब शाळा आणि नर्सरीजना मिळाली होती दान मेक्सिकोमध्ये टोळीयुद्धं मोठ्या प्रमाणावर होतात. तिथले सशस्त्र गट अनेकदा स्थानिक नागरिकांना प्रतिस्पर्ध्यांसोबतच्या लढाईत भाग घेण्याची जबरदस्ती करतात. मेक्सिकोच्या बहुचर्चित 'प्लेन लॉटरी'मधली (plane lottery) अनेक '500-पेसो' तिकिटं अज्ञात लाभार्थ्यांनी विकत घेतली होती आणि देशभरातल्या गरीब शाळा व नर्सरीजना दान केली होती. यामध्ये ओकोसिंगो गावातल्या नर्सरीचाही समावेश होता. सप्टेंबर 2020मध्ये करण्यात आली होती विजेत्यांची घोषणा मेक्सिकन सरकारनं हॉस्पिटमधल्या सुविधांची पूर्तता करण्याच्या हेतून पैसे उभारण्यासाठी लॉटरी आयोजित केली होती. सप्टेंबर 2020 मध्ये 100 विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आणि ही यादी मेक्सिकन वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यात आली. या विजेत्यांमध्ये ओकोसिंगो या गावातल्या एका छोट्या नर्सरीचाही समावेश होता. लॉटरी लागल्याची बातमी समजल्यानंतर सुरुवातीला नर्सरीतल्या मुलांच्या पालकांसह गावकऱ्यांनी जल्लोष केला; मात्र ही बातमी आजूबाजूला पसरताच अडचणींना सुरुवात झाली. 'लॉस पेट्युल्स' या सशस्त्र गटाकडून मिळाल्या धमक्या पालक संघटनेच्या सदस्यांचं (Members of Parents Association) म्हणणं आहे की, त्यांना लॉस पेट्युल्स (Los Petules) नावाच्या सशस्त्र गटाकडून धमक्या मिळाल्या होत्या. बक्षिसाची रक्कम टोळीला बंदुका खरेदी करण्यासाठी द्यावी अशी त्यांची मागणी होती. याच गटानं शेजारच्या गावातल्या प्रतिस्पर्धी गटावर हल्ला करण्याचा कट रचला होता. त्यासाठी त्यांना शस्त्रांची आवश्यकता होती, अशी माहिती मिळाली आहे. टोळीच्या हल्ल्यानंतर 28 कुटुंबांनी गाव सोडून पलायन केलं नर्सरीतल्या मुलांच्या पालकांनी टोळीला पैसे देण्यास नकार दिला. पैशांतला काही भाग नर्सरीच्या नवीन टेरेसवर खर्च केला. पालकांनी उरलेले 14 दशलक्ष पेसो त्यांचं गाव सुधारण्यासाठी वापरण्याचं ठरवलं तेव्हा त्यांचा धोका वाढला. या वर्षी मार्च 2021 मध्ये टोळीच्या सदस्यांनी एका मुलाच्या वडिलांची गोळ्या झाडून हत्या केली. हत्या झालेल्या व्यक्तीनं टोळीला पैसे देण्यास नकार दिला होता. गेल्या (ऑक्टोबर) महिन्यात या टोळीनं गावातल्या महिला आणि मुलांवर हल्ला केल्यानं परिस्थिती आणखीच बिकट झाली. त्यानंतर 28 कुटुंबांनी गावातून पलायन केलं. टोळीयुद्ध संपेपर्यंत कुटुंबं गावात परत येणं अशक्य पालक संघटनेच्या सदस्यानं सांगितलं, की गावात राहणाऱ्या नागरिकांनी गुरं, त्यांची घरं, रेफ्रिजरेटर, कॉर्न व बीन्सची पिकं, कोंबड्या या टोळीयुद्धामध्ये (Gang war) गमावली आहेत. पीडित कुटुंबांनी स्थानिक अधिकाऱ्यांना त्यांच्या दुर्दशेबद्दल सावध केलं होतं. परंतु, त्यांनी दुर्लक्ष केलं. आता जोपर्यंत टोळीयुद्ध संपत नाही तोपर्यंत ही कुटुंबं आपल्या घरी परत येऊ शकणार नाहीत, अशी माहिती कुटुंबांच्या प्रवक्त्यानं दिली.
First published:

Tags: Lottery, Mexico

पुढील बातम्या