जाहिरात
मराठी बातम्या / Viral / भाषा अन् बोली : झणझणीत, चमचमीत, 1 नंबर; मराठीला समृद्ध करणाऱ्या बोलीभाषांमधील Viral गाणी

भाषा अन् बोली : झणझणीत, चमचमीत, 1 नंबर; मराठीला समृद्ध करणाऱ्या बोलीभाषांमधील Viral गाणी

व्हायरल गाणी

व्हायरल गाणी

मराठी भाषेचं महत्त्व सांगण्यासाठी दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी आपल्या देशात मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो. आज ‘मराठी भाषा गौरव दिन’ असून सर्वत्र साजरा करताना पहायला मिळत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : मराठी भाषेचं महत्त्व सांगण्यासाठी दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी आपल्या देशात मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो. आज ‘मराठी भाषा गौरव दिन’ असून सर्वत्र साजरा करताना पहायला मिळत आहे. या दिवशी मराठीतील ज्येष्ठ लेखक, कवी, नाटककार वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांची जयंती साजरी केली जाते. कुसुमाग्रजांनी अनेक कथा, कादंबरी, काव्यसंग्रह आणि नाटक याच्या माध्यमातून मराठी भाषेला गौरव प्राप्त करुन दिला आहे. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली. मराठीमध्येही अनेक बोलीभाषा बोलल्या जातात. मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी आपण मराठीला समृद्ध करणाऱ्या बोलीभाषांमधील Viral गाण्यांविषयी जाणून घेऊया. मराठीला समृद्ध करणाऱ्या बोलीभाषांमधील अनेक गाणी प्रचंड व्हायरल होतात आणि प्रेक्षकांना वेड लावतात. यातील काही 5 गाणी नक्की ऐका. लता मंगेशकर, हेमंत कुमार यांनी गायलेलं सुप्रसिद्ध गाणं ‘वल्हव रे नखवा हो…वल्हव रे रामा’. हे सुंदर गाणं हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. शांता शेळके यांचं हे लिरीक्स आहेत.

काही अहिराणी गाणी अशी आहेत ज्यांच्यापुढे बॉलिवूडचीही गाणी फेल होतात. त्यातलंच एक गाणं म्हणजे ‘देख तुनी बायको कशी नाची राहिली’

श्रीरंग गोडबोले यांचं ‘ही माय भूमी ही जन्म भूमी’ हे गाणं देखील खूप व्हायरल आणि चर्चेत असतं. अजय-अतुल यांनी या गाण्याला संगीत दिलं असून स्वप्निल बांदोडकर यांनी हे गायलंय.

कोकणाविषयी सर्वकाही सांगणारं गाणं म्हणजे ‘जगात एक नंबर आमचं कोकण हे सुंदर’. हे गाणं देखील खूप व्हायरल झालं होतं आणि या गाण्याला खूप सारं प्रेम मिळालं होतं.

‘शांताबाई’ हे सोशल मीडियावर चांगलंच ट्रेंड झालं होतं. या गाण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात पहायला मिळाली आणि अजूनही हे गाणं अनेकांचं आवडतं आहे. अनेक लग्नांमध्ये किंवा कोणत्या समारंभासाठी हे गाणं हमखास वाजवलं जातं.

भारतामध्ये मराठी भाषिकांची संख्या ही तिसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक मराठी भाषा दिवसनिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात