मुंबई, 12 एप्रिल : प्रसिद्ध होण्यासाठी हल्ली कुणी काहीही करायला तयार असतं. स्टंटचे तर बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. इतका खतरनाक स्टंट कदाचित तुम्ही कधीच पाहिला नसेल. व्हिडीओ पाहूनच धडकी भरेल. हृदय कमजोर असेल तर मन घट्ट करूनच हा व्हिडीओ पाहा (Dangerous stunt video). काही तरुण उंचावरून उडी मारण्याचा स्टंट करतात. हा व्हिडीओही तसाच आहे. पण हा खूपच भयानक आहे. व्हिडीओ दुसरा तरुण मारत असला तरी तुम्हीच उंचावरून कोसळत आहात की काय असंच तुम्हाला वाटेल. तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला एका तरुणाचे पाय दिसतात. तरुण एका उंच ठिकाणी उभा दिसतो आहे. तो एका गगनचुंबी इमारतीवर उभा आहे. इमारतीच्या रेलिंगवर तो आहे. एकच पाय ठेवता येईल इतकीच जागा या रेलिंगवर आहे. पण त्यावर हा तरुण बिनधास्तपणे चालताना दिसतो आहे. सोबतच तो आपला व्हिडीओही शूट करत आहे. त्याच्या पावलांकडे हा कॅमेरा आहे. ज्यामुळे तो जिथंजिथं उड्या मारतो ते सर्वकाही दिसतं. किंबहुना त्याला उडी मारताना पाहताना आपणच उडी मारत आहोत की काय, असंच वाटतं. इमारत इतकी उंच आहे की फक्त व्हिडीओत पाहूनच आपल्याला भिरभिरतं, चक्कर आल्यासारखं वाटतं. हे वाचा - बापरे! 3-3 बैलांनी एकत्र महिलेला शिंगांनी उडवून पायाखाली तुडवलं; अंगावर काटा आणणारा VIDEO पुढे व्हिडीओ पाहिला तर तुमच्या काळजाचा ठोकाच चुकेल. तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडी मारतानाही दिसतो. त्याला असं करतान बिलकुल भीती नाही वाटत आहे.
Vicious Videos या ट्विटर अकाऊंटवर हा खतरनाक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कसंतरी वाटेल. असं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये दिलं आहे. व्हिडीओ पाहून बहुतेक युझर्स शॉक झाले आहेत. अनेकांनी आपल्या काळजात धडकी भरली, आपल्याला हार्ट अटॅकसारखं वाटत आहे, अशा कमेंट केल्या आहेत. हे वाचा - जीवापेक्षा सेल्फी हवा! पुरात बुडाली तरी पाण्याबाहेर हात ठेवून शूट करत राहिली VIDEO असे खतरनाक स्टंट हे प्रोफेशनल्सच्या देखरेखीत केले जातात. हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याने आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. कृपया व्हिडीओ पाहून तुम्ही असे जीवघेणे स्टंट करण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका, असं आवाहन आम्ही तुम्हाला करत आहोत.

)







