मुंबई, 23 मार्च : वाघाच्या हल्ल्याचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बहुतेक व्हिडीओ हे जंगलातील असतात जिथं वाघ इतर प्राण्यांवर हल्ला करताना दिसतो. वाघांना माणसांवर हल्ल्या केल्याच्या बऱ्याच बातम्या तुम्ही वाचल्या, ऐकल्या, पाहिल्या असतील. पण माणसांवर हल्ला करताना वाघांना तुम्ही प्रत्यक्षात पाहिलं आहे का? असाच एक धडकी भरवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका भुकेल्या वाघाने एका व्यक्तीवर खरतनाक हल्ला केला आहे (Tiger attack on biker).
जंगल सफारी करताना किंवा नॅशनल पार्कमध्ये रस्त्यावर गाडीसमोरून वाघांना जाताना किंवा गाडीसमोर बसलेलं तुम्ही पाहिलं आहे. काही वेळा या वाघांना गाडीवर चढलेलंही तुम्ही पाहिलं असेल. सोशल मीडियावर असे व्हिडीओ व्हायरल होतात. हे वाघ तसे माणसांवर हल्ला करताना दिसत नाहीत. पण जेव्हा ते गाडीसमोर किंवा गाडीच्या बाजूने फिरतात तेव्हा ते पाहूनच आपल्याला घाम फुटतो. विचार करा या वाघांनी जर गाडीत बसलेल्या व्यक्तींवर हल्ला केला तर... शिवाय अशा गाड्यांमध्ये सुरक्षारक्षक असतात किंवा जाळ्या असतात ज्यामुळे वाघासारख्या हिंस्र प्राण्यांपासून बचाव करता येतो. पण जर एखादी व्यक्ती बाईकवर असेल आणि त्या बाईकस्वारावर वाघाने हल्ला केला तर काय होऊ शकतं, हे तुम्हाला या व्हिडीओत दिसेल.
हे वाचा - VIDEO - माणसं फक्त तमाशा पाहत राहिली; अखेर एका गाईनेच श्वानाला हैवानाच्या तावडीतून सोडवलं
एरवी एखाद्या प्राण्याच्या मागे त्याची शिकार करण्यासाठी धावणारा वाघ तुम्ही पाहिला असेल. पण या व्हिडीओत एका बाईकच्या मागे वाघ धावताना दिसला. वाघ जंगलातून धावत बाहेर रस्त्यावर येतो. त्याचवेळी त्याच्यासमोरून एक बाईक जाते. वाघ धावत या बाईकचा पाठलाग करतो. बाईकमागे तो वाऱ्याच्या वेगाने धावतो. बाईकपर्यंत पोहोचतोही. त्यावेळी आपल्या हृदयाचीही धडधड वाढते. वाघ हल्ला करणार तोच बाईकस्वारही आपल्या गाडीचा वेग वाढवतो.
View this post on Instagram
सुदैवाने बाईकस्वार वाघापासून थोडा दूर जातो आणि वाघ रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जात जंगलात घुसतो. बाईकस्वाराने वेग वाढवला म्हणून त्याचा जीव वाचला. वाघाच्या तावडीत सापडता सापडता तो राहिला. वाघापासून त्याचा जीव वाचला.
हे वाचा - काय सांगता! कॅमेऱ्यात कैद झाली हसणारी मगर; विश्वास बसत नसेल तर हा VIDEO बघाच
kaur_riya26 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tiger, Tiger attack, Tiger hunting video, Viral, Viral videos, Wild animal