जाहिरात
मराठी बातम्या / Viral / शेवटी तो डॉक्टर दाम्पत्याचाच मुलगा; मृत्यूनंतरही 11 जणांचा जीव वाचवला

शेवटी तो डॉक्टर दाम्पत्याचाच मुलगा; मृत्यूनंतरही 11 जणांचा जीव वाचवला

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

डॉक्टर दाम्पत्याच्या मुलाने मृत्यूनंतर 11 जणांना जीवनदान दिलं आहे.

  • -MIN READ Palghar,Thane,Maharashtra
  • Last Updated :

पालघर, 20 मे : डॉक्टर जे रुग्णांसाठी देवच. कित्येक लोकांचा जीव ते वाचवतात. अशाच एका डॉक्टर दाम्त्याचा मुलगा. ज्याने मृत्यूनंतरही कित्येकांचा जीव वाचवला आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 11 लोकांचे प्राण डॉक्टर कपलच्या एका मुलाने वाचवले आहेत. जे जिवंतपणी तो करू शकला नाही ते त्याने मृत्यूनंतर करून दाखवलं आहे. महाराष्ट्राच्या पालघरमधील हे प्रकरण चर्चेत आलं आहे. जिवंत व्यक्तीही एखाद्या व्यक्तीला मृत्यूच्या दारात पाहिल्यावर त्याचा जीव वाचवू की नको याचा विचार करतात. एखाद्याला वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजू लावणारे क्वचितच असतात. पण डॉक्टर दाम्पत्याचा हा मुलगा ज्याने जिवंतपणी नव्हे तर मृत्यूनंतरही अनेकांना जीवनदान दिलं आहे. आता हे कसं शक्य आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. साकेत दंडवते असं या व्यक्तीचं नाव. त्याचे आईवडील दोघंही डॉक्टर. 30 वर्षांच्या साकेतचा अपघात झाला. रस्ते अपघातात त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूचं दुःख आईवडिलांना होतंच. पण त्यातही त्यांनी कौतुकास्पद असा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या मुलाचं अवयवदान करायचं ठरवलं. यामुळे कित्येकांना जीवनदान मिळालं आणि या अवयवाच्या रूपात या लोकांच्या शरीरात त्यांचा मुलगाही जिवंत राहिला. कलियुगातील श्रावण बाळ! लाखोंची नोकरी सोडली; वडिलांच्या निधनानंतर स्कूटरने आईला करवतोय भारत दौरा साकेतचे वडील डॉ. विनीत दंडवते हे स्वतः आयएमएचे अधिकारी आहेत. 5 महिन्यांपूर्वीच त्यांच्या मुलाचं लग्न झालं होतं. अवयवदानासाठी त्याच्या पत्नीचीही परवानगी घेण्यात आली आणि तिनेही होकार दिला. पीटीआयच्या वृत्तानुसार इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र सचिव डॉ.संतोष कदम यांनी सांगितलं की, दान केलेल्या अवयवांचा किमान 11 जणांना फायदा आहे. आता प्रत्येकजण केवळ आई-वडिलांचे कौतुक करत नाही तर त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाच्या आत्म्याला मुक्ती मिळावी यासाठी प्रार्थनाही करत आहे. वाढदिवसाच्या दिवशी हार्ट अटॅकने 16 वर्षीय मुलाचा मृत्यू, कुटुंबीयांनी मृतदेहासमोर कापला केक अशा घटनांमुळे देशातील अधिकाधिक लोकांना अवयव दान करण्याची प्रेरणा मिळते जेणेकरून अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्यांचे प्राण वाचवता येतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात