मराठी बातम्या /बातम्या /Viral /Hey म्हणताच कर्मचाऱ्यावर भडकला बॉस; आपण नेहमी वापरत असलेल्या या शब्दात असं आहे तरी काय?

Hey म्हणताच कर्मचाऱ्यावर भडकला बॉस; आपण नेहमी वापरत असलेल्या या शब्दात असं आहे तरी काय?

बॉस आणि कर्मचाऱ्यातील सोशल मीडियावरील चॅटचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉस आणि कर्मचाऱ्यातील सोशल मीडियावरील चॅटचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉस आणि कर्मचाऱ्यातील सोशल मीडियावरील चॅटचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई, 01 जुलै : Hey काय करतोस?, Hey कुठे चाललीस?, Hey जेवलात का?, Hey हा शब्द आपण प्रत्येक जण किती तरी वेळा वापरतो. सोशल मीडियाच्या जगात चॅटसाठी सर्रास वापरल्या जाणाऱ्या कॉमन शब्दांपैकी हा एक शब्द. तसं या शब्दात काहीच आक्षेपार्ह नाही. एखाद्याचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी आपण हा शब्द वापरतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल याच शब्दामुळे एका व्यक्तीचा बॉस त्याच्यावर इतका भडकला की त्याची नोकरीही धोक्यात आली. असं या शब्दात नेमकं आहे तरी काय?

सध्या कोरोनामुळे अद्यापही काही लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे बॉस-कर्मचाऱ्यांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातूनच संवाद होत आहेत. अशाच एका बॉस आणि कर्मचाऱ्यातील सोशल मीडियावरील चॅटचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेडिटवर एका व्यक्तीने आपल्या बॉससोबतच्या चॅटिंगचा हा स्क्रिनशॉट शेअर केला आहे.

या स्क्रिनशॉटमध्ये तुम्ही पाहू शकता, या व्यक्तीला बॉसने  मेसेज करून काहीतरी विचारलं होतं. दुसऱ्या दिवशी या मेसेजला रिप्लाय करताना नॉर्मल ग्रीटिंग म्हणून आधी Hey असा मेसेज केला. ते वाचताच त्याच्या बॉसचा पारा चढला.

हे वाचा - कोण आहे तो करोडपती? 71 कोटी रुपये खात्यात पाठवायचेत; पण पैशांसाठी मिळेना दावेदार

आता तुम्ही म्हणाल या शब्दात इतकं काय चुकीचं आहे. आपण नेहमी तर हा शब्द वापरतो. पण आपल्याला हा शब्द का खटकतो, याचं कारणही पुढे या बॉसने दिलं आहे. त्याने आपल्या या कर्मचाऱ्याला भलामोठा मेसेज पाठवला.

बॉस त्याला म्हणाला, कृपया Hey चा प्रयोग करू नको. मला ते अपमानास्पद वाटतं. जर तुलामाझं नाव लक्षात राहत नाही तर मला फक्त Hi पाठव.  कधीच प्रोफेशनल जगात Dude, Man असं लिहू नये. त्याऐवजी Hello म्हणू शकतो. तसंच सीनिअर्सना Chap किंवा Chick असंही लिहून पाठवू नये.

तुला समजलं तर ठिक, नाहीतर लवकरच समजेल, असंही बॉस त्याला म्हणाला.  पण Hey आणि Hi मध्ये नेमका काय फरक आहे हे या बॉसने सांगितलं नाही.

हे वाचा - 'नवरा भाड्याने देणं आहे', बायकोने सोशल मीडियावर दिली जाहिरात; कारणही आहे शॉकिंग

तुम्हाला यातील फरक माहिती असेल किंवा Hey हा शब्द खटकत असेल तर तो का? हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा आणि हो सर्वात महत्त्वाचं तुम्हीही तुमच्या बॉसला मेसेज पाठवताना काळजी घ्या. शब्दांचा वापर जपून करा.

First published:

Tags: Social media, Viral, Whatsapp chat, Whatsapp messages