मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO - सिंहाने जांभई देताच मजेमजेत तरुणाने त्याच्या जबड्यात टाकलं बोट आणि...; भयंकर दृश्य कॅमेऱ्यात कैद

VIDEO - सिंहाने जांभई देताच मजेमजेत तरुणाने त्याच्या जबड्यात टाकलं बोट आणि...; भयंकर दृश्य कॅमेऱ्यात कैद

तरुणाने सिंहाच्या तोंडात टाकलं बोट आणि...

तरुणाने सिंहाच्या तोंडात टाकलं बोट आणि...

पिंजऱ्यात बंदिस्त सिंहासोबत नको ती मस्ती तरुणाच्या अंगाशी आली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 19 जानेवारी : एखाद्याने जांभई दिली की त्याच्या तोंडात बोट टाकण्याची सवय अनेकांना असते. तुम्ही कधीतरी असं केलं असेल किंवा तुमच्यासोबत कुणीतरी असं केलं असावं. पण असं बोट तुम्ही सिंहासारख्या खतरनाक प्राण्याच्या जबड्यात टाकण्याचा विचार तरी कराल का? फक्त कल्पननेच तुम्हाला घाम फुटला ना? पण एका तरुणाने हे प्रत्यक्षात केलं. त्यानंतर त्याचं काय झालं तो भयंकर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

एका प्राणीसंग्रहालयातील हा व्हिडीओ आहे. जिथं एका तरुणाने पिंजऱ्यात बंदिस्त असलेल्या सिंहाशी मस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण ही मस्ती त्याला चांगलीच महागात पडली. त्याच्याच अंगाशी आली. त्याने सिंहाने जांभई देताच मजेमजेत त्याच्या जबड्यात बोट टाकलं आणि पुढे भयंकर घडलं.

हे वाचा - वाघ दिसताच एक्साइटमेंटमध्ये कॅमेरा घेऊन त्याच्या मागे धावत गेली व्यक्ती, शेवटी...; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक भलामोठा सिंह पिंजऱ्यात आहे. पिंजऱ्याबाहेर एक तरुण उभा आहे. सिंह आणि तरुणाच्या मध्ये फक्त एक जाळं आहे. जसा सिंह तरुणाला पिंजऱ्याबाहेर पाहतो तसा तो उठून तिथं येतो. त्याचवेळी तो जांभई देतो. सिंहाचं तोंड उघडताच तरुण आपला हात त्या पिंजऱ्यात टाकतो आणि तरुणाच्या चेहऱ्याला हात लावतो. सिंहाचा जबडा उघडाच असल्याने जसा तरुण त्याला हात लावतो तसा तो त्याचा हात आपल्या जबड्यात धरतो. त्याच क्षणी आपल्या हृदयाचा ठोका चुकतो.

सिंह तरुणाचा हात अगदी घट्ट आपल्या तोंडात धरून ठेवतो. तरुण सिंहाच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपडत असतो. पण काही केल्या त्याच्या तोंडातून हात निघत नाही. आजूबाजूला काही लोकही आहेत. जे हे भयंकर दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करत आहेत. पण तरुणाच्या मदतीसाठी कुणीही पुढे जाण्याची हिंमत करत नाही.

earth.reel  नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यातआला आहे. हे काय होतं आहे, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

हे वाचा - Shocking! एकाच वेळी 4 सिंह तुटून पडले तरी बचावला तरुण; कसा वाचवला स्वतःचा जीव पाहा LIVE VIDEO

व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा. व्हिडीओच्या शेवटी तरुण कसंबसं स्वतःला सिंहाच्या तावडीतून सोडवतो. किंबहुना काय माहिती कदाचित सिंह तसा शिकारीच्या मूडमध्ये नव्हता. आपल्याला त्रास देणाऱ्याला त्याला फक्त अद्दल घडवायची होती. म्हणून की काय त्याने फक्त हल्ल्याचा ट्रेलर दाखवला आणि तरुणाला सोडून दिलं. त्यामुळे तरुणाचा जीव वाचला.

View this post on Instagram

A post shared by Earth Reels (@earth.reel)

व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे. तरुणाच्या या वागण्याला मूर्खपणा म्हटलं आहे. तर काहींनी पाहत राहून व्हिडीओ बनवणाऱ्यांनाही सुनावलं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

First published:
top videos

    Tags: Shocking viral video, Viral, Viral videos, Wild animal